News Flash

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा : भारतीय महिला संघ अंतिम फेरीत

पुरुषांमध्ये तिसऱ्या मानांकित भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनविरुद्ध ४-४ अशा बरोबरीनंतर शूट-ऑफमध्ये २६-२७ असा निसटता पराभव पत्करला.

दीपिका कुमारी, अंकिता भकट आणि कोमालिका बारी यांचा समावेश असलेल्या भारताच्या रीकव्र्ह संघाने विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात स्पेनला सरळ सेटमध्ये नमवून अंतिम फेरी गाठली आहे. तसेच भारताच्या पहिल्या सुवर्णपदकाच्या आशा जिवंत केल्या आहेत.

पुरुषांमध्ये तिसऱ्या मानांकित भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनविरुद्ध ४-४ अशा बरोबरीनंतर शूट-ऑफमध्ये २६-२७ असा निसटता पराभव पत्करला. आणखी तीन स्पर्धा प्रकारांमध्ये भारताला पदकाच्या आशा आहे. दीपिका आणि अतानू दास जोडी मिश्र दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत खेळणार आहे. तसेच वैयक्तिक प्रकारातही या दोघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.

महिलांच्या उपांत्य सामन्यात अग्रमानांकित भारतीय त्रिकुटापुढे स्पेनच्या एलिया कॅनालीस, इनीस डी व्हेलास्को आणि लेयरे फर्नांडीस इन्फॅन्टे यांचा निभाव लागला नाही. ५५, ५६ आणि ५५ असे गुण मिळवत भारतीय संघाने ६-० अशा विजयासह शांघाय (२०१६) नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली. रविवारी भारताची अंतिम फेरीत मेक्सिकोशी गाठ पडणार आहे.

भारताच्या रीकव्र्ह महिला संघाने शांघाय (२०११), मेडेलिन (२०१३), रॉकलॉ (२०१३ आणि २०१४) अशी चार सुवर्णपदके मिळवली आहेत. जूनमध्ये पॅरिसला विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेचा तिसरा टप्पा होणार आहे. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रतेची ती अखेरची संधी असेल. त्यामुळे या स्पर्धेतील कामगिरी भारतीय संघासाठी प्रेरणादायी ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:03 am

Web Title: world cup archery indian womens team in the final akp 94
Next Stories
1 मिताली राजचे निवृत्तीचे संकेत
2 दमदार दिल्लीची झुंजार हैदराबादशी गाठ
3 रक्तद्रव दानासाठी सचिनची हाक
Just Now!
X