News Flash

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : डुडाकडून विदित पराभूत

यान-क्रिस्टॉफ डुडाविरुद्धच्या दुसऱ्या डावात विदित पराभूत झाला.

विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : डुडाकडून विदित पराभूत

पीटीआय, सोची (रशिया)

‘फिडे’ विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताच्या विदित गुजराथीचे आव्हान संपुष्टात आले. यान-क्रिस्टॉफ डुडाविरुद्धच्या दुसऱ्या डावात विदित पराभूत झाला.

भारतीय बुद्धिबळ क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या २६ वर्षीय विदितने पोलंडच्या डुडाविरुद्धच्या दुसऱ्या डावात काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना ५० चालींनंतर पराभव मान्य केला. बुधवारी या दोघांमध्ये झालेला पहिला डाव बरोबरीत सुटला होता. गुजराथीने प्रथमच विश्वचषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. डुडाचा उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनशी सामना होईल. कार्लसनने रशियाच्या सर्जी कार्याकिनला २-० असे नमवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 2:04 am

Web Title: world cup chess tournament akp 94
Next Stories
1 भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिका : मालिका पराभवाची भारतावर नामुष्की!
2 पदकांच्या आशा कायम…
3 अतानूचा माजी ऑलिम्पिक विजेत्याला धक्का