21 September 2020

News Flash

भारताचा थायलंडवर दिमाखदार विजय

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे थायलंडचा डाव २९.१ षटकांत ५५ धावांमध्ये कोसळला.

| February 9, 2017 03:11 am

महिला विश्वचषक पात्रता फेरीत भारताने थायलंडसारख्या नवख्या संघाला केवळ ५५ धावांमध्ये गुंडाळले आणि नऊ फलंदाज राखत दिमाखदार विजय मिळवला.

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे थायलंडचा डाव २९.१ षटकांत ५५ धावांमध्ये कोसळला. भारताकडून मानसी जोशीने केवळ चार धावांमध्ये तीन गडी बाद केले. दीप्ती शर्मा, पूनम यादव व राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताच्या थिरुश कामिनी (नाबाद २४) व वेदा कृष्णमूर्ती (नाबाद १७) यांनी संघाला १२.४ षटकांत विजय मिळवून दिला. भारताची अनुभवी खेळाडू हरमानप्रित कौरला बाद करण्यात थायलंडला यश मिळाले.

संक्षिप्त धावफलक

थायलंड :  २९.१ षटकांत सर्व बाद ५५ (मानसी जोशी ३/४) पराभूत वि. भारत :  १२.४ षटकांत १ बाद ५९ (थिरुश कामिनी नाबाद २४, वेदा कृष्णमूर्ती नाबाद १७).

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 3:11 am

Web Title: world cup qualifiers indian eves beat thailand by nine wickets
Next Stories
1 बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी आजपासून
2 ‘पाकच्या निराशाजनक कामगिरीसाठी परदेशी प्रशिक्षक जबाबदार’
3 हार्दिक पंड्या भारतीय कसोटीचे क्रिकेटचे भविष्य- अनिल कुंबळे
Just Now!
X