विश्वचषक नेमबाजी स्पर्धा

अपूर्वी चंडेला आणि दीपक कुमार जोडीने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताला चौथे सुवर्णपदक जिंकून दिले. अंजूम मुद्गिल आणि दिव्यांश सिंह पनवार यांनी भारत-२ संघाचे प्रतिनिधित्व करताना कांस्यपदक पटकावले.

१० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात अपूर्वी आणि दीपक जोडीने चीनच्या यांग क्विआन आणि यू हॉनान जोडीचा एकतर्फी अंतिम सामन्यात १६-६ असा पराभव केला. अंजूम आणि दिव्यांश जोडीने हंगेरीच्या जोडीचा १६-१० असा पाडाव केला. भारताने चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशा एकूण सात पदकांसह विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या गुणतालिकेतील अग्रस्थान टिकवले आहे.