२०१९ विश्वचषक स्पर्धेला राजकीय मुद्द्यांवर सुरु असलेली बॅनरबाजी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीये. बर्मिंगहॅमच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यात पुन्हा एकदा मैदानाबाहेर बलुचिस्तानचा मुद्दा घेऊन बॅनरबाजी करण्यात आली. मैदानावरुन एक विमान, World must speak up for Balochistan” असा बॅनर घेऊन घिरट्या घालताना दिसलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओही व्हायरल व्हायला लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान हे बर्मिंगहॅमच्या मैदानावर किमान पाचवेळा घिरट्या घालताना दिसलं. याआधीही पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात आणि भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात विमानामधून अशीच बॅनरबाजी करण्यात आली होती. या घटनेनंतर आयसीसीने मैदानाबाहेर No Flying Zone जाहीर केल्यानंतरही हे प्रकार थांबताना दिसत नाहीयेत.