कानपूर कसोटीत न्यूझीलंडच्या संघावर १९७ धावांनी दणदणीत विजय साजरा केल्यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गजांनी भारतीय संघाच्या विजयावर ट्विटरवर आपलं मत व्यक्त केले. भारतीय संघाकडून आर.अश्विनने एकूण १० विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाने सहा विकेट्स मिळवल्या. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३९ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाला केवळ २३६ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारतीय संघाचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता. या ऐतिहासिक सामन्यात भारताने विजयी नोंद केली.

वाचा: कानपूर कसोटीतील पराभवानंतर न्यूझीलंड संघाला आणखी एक धक्का

भारतीय संघाच्या विजयावर विराट कोहली म्हणाला की, संघातील प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. न्यूझीलंडच्या दिशेनेही सामना सुरूवातीला झुकला होता, पण सांघिक कामगिरीमुळे आम्ही पुनरागम करू शकलो. अश्विन आणि जडेजा यांनी महत्त्वाचे योगदान दिले. दोघांनीही मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्याने प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करता आला. याशिवाय, आघाडीच्या वेळीही जडेजा आणि रोहित केलेली फलंदाजी महत्त्वाची ठरली.

वाचा: …म्हणून भारतीय संघाला ५०० वी कसोटी जिंकता आली

भारतीय संघाच्या विजयानंतर क्रीडा समीक्षक हर्षा भोगले याने आर.अश्विनचे कौतुक केले, तर माजी गोलंदाज इरफान पठाण याने रविंद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. याशिवाय, भारतीय संघालाही या ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

कोण काय म्हणालं?-