भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू सौरव घोषाल याने जागतिक अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. ११ व्या मानांकित सौरवने वेल्सच्या जोएल मकिन याच्यावर ११-१३, ११-७, ११-७, १३-११ असा विजय मिळवला. सौरवने पहिला गेम छोट्या फरकाने गमावला. पण त्यानंतर मात्र त्याने जोरदार कमबॅक केले. दुसरा आणि तिसरा गेम त्याने ११-७ असा जिंकला. चौथा गेम पुन्हा अटीतटीचा झाला. पण अखेर १३-११ असा गेम जिंकत सौरवने सामना खिशात घातला.
सौरवने कारकिर्दीत दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम आठ खेळाडूंमध्ये प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित सिमोन रोस्नरशी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 12:25 pm