20 January 2021

News Flash

सानिया मिर्झा प्रेक्षकांविना क्रीडा स्पर्धा खेळण्यास तयार

वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात स्पष्ट केलं मत

एकीकडे देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. बीसीसीआयनेही पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएलचा तेरावा हंगाम स्थगित केला आहे. तरीही सोशल मीडियावर प्रेक्षकांविना क्रीडा स्पर्धा खेळवण्याची मागणी काही खेळाडू करत आहेत. त्यात भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचीही भर पडली आहे.

“तुम्ही सामना खेळण्यासाठी मैदानावर येत असतात आणि चाहते तुम्हाला चिअर करत असतात…कोणत्याही खेळाडूला हेच चित्र पहायचं असतं. पण सध्या आमच्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाहीये. प्रेक्षकांविना खेळण्यास नकार दिला तर आता खेळूच शकणार नाही असं वाटायला लागलंय. मला स्वतःला प्रेक्षकांविना क्रीडा स्पर्धा खेळवण्यास काहीही हरकत नाही. माझ्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी पोहचण्याचा प्रवास हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही स्पर्धेचा सराव कधी करणार, दोन आठवडे आधी तुम्ही त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही…यात खूप मोठा धोकाही आहे.” सानिया मिर्झा India Today च्या एका कार्यक्रमात बोलत होती.

टेनिस जगतात मानाचं स्थान असलेली विम्बल्डन स्पर्धाही आयोजकांनी करोनाच्या भीतीमुळे रद्द केली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेचं आयोजन वेळेत होईल असा आयोजकांना विश्वास आहे…परंतु जगभरातील परिस्थिती पाहता या स्पर्धेवरही टांगती तलवार आहे. त्यामुळे आगामी काळात संपूर्ण जग करोनाच्या जोखडातून कधी मोकळं होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 8:27 pm

Web Title: would play in empty stadium sania mirza in favour of organizing sports events behind closed doors psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 आयपीएल श्रीलंकेत?? लंकन बोर्डाच्या प्रस्तावावर बीसीसीआय म्हणतं…
2 लोकेश राहुलचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणूनच वापर व्हायला हवा – मोहम्मद कैफ
3 मी अजुनही टी-२० क्रिकेट खेळू शकतो – दिनेश कार्तिक
Just Now!
X