23 October 2020

News Flash

विनेश फोगाट-बजरंग पुनिया अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत

क्रीडा मंत्रालयातील सुत्रांची माहिती

बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट, यंदाच्या अर्जुन पुरस्कारांच्या शर्यतीत असल्याची माहिती समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंगने कुस्ती महासंघातर्फे अर्जुन पुरस्कारांसाठी आपला अर्ज दाखल केल्याचं कळतंय. तर केंद्रीय क्रीडा मंत्रालय विनेश फोगाटचा पुरस्कारासाठी विचार करत असल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.

भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, आशिया खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. यानंतर निवड समितीला खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात येणार आहे. दरवर्षी २९ ऑगस्टरोजी अर्जुन पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. मात्र सध्या सुरु असलेल्या आशियाई खेळांमुळे यंदा हे पुरस्कार सप्टेंबर महिन्यात ढकलण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमीत्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.

क्रीडा मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, भालाफेकपटू नीरज चोप्रा हे देखील या मानाच्या पुरस्काराच्यां शर्यतीत आहे. सध्या इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये बजरंग पुनियाने भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर विनेष फोगट महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2018 5:22 pm

Web Title: wrestlers bajrang punia vinesh phogat in race for khel ratna award after golden 2018
टॅग Bajrang Puniya
Next Stories
1 Asian Games 2018 : इंडोनेशियाचे पदक विजेते खेळाडू बक्षिसाची रक्कम भूंकपग्रस्तांना दान देणार
2 Ind vs Eng : रविचंद्रन आश्विन सर्वोत्कृष्ट ऑफस्पिनर, इंग्लंडच्या माजी खेळाडूची स्तुतीसुमनं
3 Ind vs Eng : मोहम्मद शामीची अँडरसनवर स्तुतीसुमने
Just Now!
X