02 December 2020

News Flash

‘रिओ ऑलिम्पिक’साठी सुशील कुमारचे मोदींना साकडे

सुशील कुमारचे नाव वगळल्याच्या वृत्ताचा भारतीय कुस्ती महासंघाने इन्कार

खांद्याच्या दुखापतीमुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळू न शकलेल्या सुशील कुमारची निवड करण्यात आलेली नाही.

‘रिओ ऑलिम्पिक”मध्ये भारताचे नेतृत्त्व करण्यासाठी मल्ल सुशील कुमारने आता थेट पंतप्रधानांना साकडे घातले आहे. सुशील कुमारने नरेंद्र मोदींना पत्र पाठवले असून ‘रिओ ऑलिम्पिक’साठी नरसिंग आणि माझ्यात सामना घेतला जावा आणि जो विजेता असेल त्याची ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात यावी, अशी मागणी सुशील कुमारने पत्रात केली आहे. याशिवाय, मोदींकडे भेटीसाठी वेळ देखील सुशील कुमारने मागितला आहे.

नरसिंग, सुशील प्रकरणापासून क्रीडा मंत्रालय दूरच

दरम्यान, ‘रिओ ऑलिम्पिक’साठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत सुशील कुमारचे नाव नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. मात्र, सुशील कुमारचे नाव वगळल्याच्या वृत्ताचा भारतीय कुस्ती महासंघाने इन्कार केला आहे. ऑलिम्पिकमध्ये कोणते खेळाडू कोणत्या वजनी गटामधून खेळणार आहेत, याची संभाव्य खेळाडूंची आयओएला पाठवायची असते. या संभाव्य यादीमध्ये सुशीलचे नाव नाही, पण याचा अर्थ सुशील ऑलिम्पिकला जाणार नाही, असा होत नसल्याचे कुस्ती संघाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 3:40 pm

Web Title: wrestling sushil kumar writes letter to pm
टॅग Pm,Sushil Kumar
Next Stories
1 मनोहर आयसीसीचे पहिले स्वतंत्र कार्याध्यक्ष
2 पंजाबविरुद्ध मुंबईचे पारडे जड
3 अव्वल हैदराबादवर दिल्लीचा विजय
Just Now!
X