News Flash

WTC Final: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची वाट पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी

या कसोटीसाठी सहावा दिवस म्हणजेच २३ जूनचा राखीव दिवस आयसीसीने ठेवलेला आहे, मात्र सहाव्या दिवशी खेळ घ्यायचा की नाही याचा निर्णय पंच घेतील असं सांगण्यात

रविंद्र जडेजानेही पाऊस पडत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : रॉयटर्स)

भारत आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final) आजपासून सुरु होणार असला तरी या सामन्यावर पावसाचे सावट आहे. कसोटी क्रिकेटला १४४ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असलेल्या या स्पर्धेमध्ये पावसाने अडथळा आणण्याची दाट शक्यता आहे. साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जाणार असला तरी साऊदम्पटनमध्ये रात्रभर पाऊस पडत आहे. पावसाच्या या धुव्वाधार बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ वेळेत सुरु होण्यासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. इंग्लंडमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सामना सुरु होणार आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार रात्री साडेनऊला पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीनला सामन्यातील प्रत्यक्ष खेळ सुरु होणार आहे. मात्र आता पावसामुळे आणि आऊट फिल्डवर पासवाचे पाणी असल्याने सामना निश्चित कधी सुरु होईल हे पूर्णपणे पावसावर अवलंबून असणार आहे.

नक्की वाचा >> WTC Final: भारत-न्यूझीलंडदरम्यानचा सामना भारतात कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?

साऊदम्पटनमधील हवामानावर क्रिकेट चाहत्यांची नजर आहे. मात्र एक्यू वेदरने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे क्रिकेट चाहत्यांनी निराशा होणार आहे. कारण १८ ते २२ जून दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलाय. इंग्लंडच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सामना सुरु होणार असला तरी त्या वेळात येथे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. हवामान खात्याने साऊदम्पटनमध्ये आज दुपारी (स्थानिक वेळेनुसार) एक वाजेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केलीय. साऊदम्पटनमध्ये पावसाची संथ धार सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळेच सामना वेळेत सुरु होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पहिल्या दिवसाचे संपूर्ण पहिले सत्र पावसाची बँटींग सुरु राहील असा अंदाज आहे. यामुळे पहिल्याच जगभरातील क्रिकेट चाहत्यांची निराशा होण्याची शक्यात आहे.

नक्की पाहा >> “तुझ्याकडे बघू की कॅमेराकडे?”; WTC Final विशेष मुलाखतीत बुमराहने मुलाखत घेणाऱ्या पत्नीलाच विचारला प्रश्न

रविंद्र जडेजानेही साऊदम्पटनमध्ये पाऊस पडत असल्याचा व्हिडीओ आपल्या इन्ताग्राम स्टोरीवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये मैदानाजवळच असणाऱ्या हॉटेलच्या रुममधील बाल्कनीत जडेजा कॉफी पिताना दिसत असून मैदानावर कव्हर टाकलेलं दिसत आहे.

एक्यू वेदरने दिलेल्या वृत्तानुसार पुढील २४ तास साऊदम्पटनमध्ये थांबून थांबून पाऊस पडणार आहे. तपमानाबद्दल बोलायचं झाल्यास साऊदम्पटनचं शुक्रवारचं सर्वाधिक तापमान हे १६ अंशांपर्यत तर किमान १२ अंशांपर्यत राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी दिवसभर थंड वातावरण असेल. याच अल्हाददायक थंडीमध्ये साऊदम्पटनच्या हॅम्पशायर बाऊल मैदानात शुक्रवार ते मंगळवारदरम्यान सामना खेळवला जाणार आहे. या पाच दिवसांदरम्यान सर्वाधिक तापमान हे १८ अंशांपर्यंत तर किमान ११ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. या पाच दिवसांदरम्यान हवेतील आर्द्रता ९० टक्क्यांपर्यंत असेल.

नक्की वाचा >> India vs Sri Lanka Series: क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या पृथ्वीच्या बेडवर दिसली अशी वस्तू की चाहत्यांनी केलं ट्रोल

WTC Final Southampton Weather ReportWTC Final Southampton Weather Report

दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी येथील हवामान हे शुक्रवारच्या तुलनेत खेळासाठी अधिक चांगलं असेल असं सांगितलं जात आहे. येथे काही काळ ऊन पडेल आणि तापमान १९ अंशांपर्यंत असण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्याची शक्यता ३५ टक्के इतकी आहे.

असं असलं तरी पाचही दिवस ऊन पडण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर मैदानातील सीमारेषांजवळचा भाग सुकण्यासाठी अडचणी निर्माण होतील. तसेच खेळपट्टीसुद्धा फिरकी गोलंदाजांपेक्षा जलदगती गोलंदाजांना अधिक फायद्याची ठरेल. यामुळेच भारताची चिंता वाढणार आहे. भारताने गुरुवारी जाहीर केलेल्या अंतिम ११ खेळाडूंच्या यादीमध्ये तीन जलदगती गोलंदाज आहेत तर दोन फिरकी गोलंदाज आहेत. फिरकी गोलंदाजीची जबाबादरी रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनच्या खांद्यावर असेल. तर जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळतील.

नक्की पाहा >> Video : WTC Final आधी ऋषभ पंतला धोनीचा फोटो दाखवला तेव्हा…; एका क्षणी द्रविडचीही झाली आठवण

एक्यू वेदरने सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस होण्याची शक्यता ६३ टक्क्यांपर्यंत असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे झाला नाही तरी आयसीसीने २३ जूनचा राखीव दिवस या कसोटीचा निकाल लावण्यासाठी ठेवला आहे. त्यामुळे संपूर्ण पाच दिवस खेळ होईल याची खबरदारी घेण्यात आलीय. सहाव्या दिवशी सामना खेळवायचा की नाही हे पंच पाचव्या दिवसाच्या हवामानानुसार ठरवतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 1:12 pm

Web Title: wtc final india vs new zealand southampton weather report scsg 91
Next Stories
1 “तुझ्याकडे बघू की कॅमेराकडे?”; WTC Final विशेष मुलाखतीत बुमराहने मुलाखत घेणाऱ्या पत्नीलाच विचारला प्रश्न
2 WTC Final: भारत-न्यूझीलंडदरम्यानचा सामना भारतात कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार?
3 Video : WTC Final आधी ऋषभ पंतला धोनीचा फोटो दाखवला तेव्हा…; एका क्षणी द्रविडचीही झाली आठवण