News Flash

WTC FINAL : तब्बल २१ वर्षानंतर न्यूझीलंडनं नोंदवला मोठा पराक्रम!

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनला मिळाला सामनावीराचा पुरस्कार

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन

न्यूझीलंडने आयसीसीच्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला दुसर्‍या डावात फक्त १७० धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने दोन गडी गमावत १३९ धावांचे लक्ष्य गाठले. टीम इंडियाने पहिल्या डावात २१७ धावा केल्या, तर न्यूझीलंडने २४९ धावा केल्या. आयसीसीतर्फे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिली कसोटी १८७७ मध्ये खेळली गेली.

२१ वर्षानंतर न्यूझीलंडला मिळाली आयसीसीची ट्रॉफी

तब्बल २१ वर्षानंतर न्यूझीलंडच्या संघाने आयसीसीचे  विजेतेपद जिंकले आहे. २००० साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले. टीम इंडियाने प्रथम खेळत ६ बाद २६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने ४ गडी आणि २ चेंडू राखून हे लक्ष्य गाठले. ख्रिस केर्न्सने नाबाद १०२ धावा केल्या होत्या.

 

 

 

 

वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी टीम इंडियाच्या सर्व २० विकेट घेतल्या. दुसर्‍या डावात टिम साऊदीने ४, तर ट्रेंट बोल्टने ३ विकेट घेतल्या. काईल जेमीसनला २ तर नील वॅगनरला एक विकेट घेता आली. एकूण सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर जेमीसनने ७, साऊदी आणि बोल्टने प्रत्येकी ५ आणि वॅगनरने तीन गडी बाद केले. न्यूझीलंडच्या संघाने फिरकीपटूशिवाय हा सामना खेळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 11:58 pm

Web Title: wtc final new zealand became the world champion and win biggest trophy in 144 years adn 96
Next Stories
1 BIG NEWS..! न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं विजेतेपद!
2 VIDEO : काय सांगता..! घरोघरी जाऊन दुचाकी वाटतोय पाकिस्तानचा ‘स्टार’ क्रिकेटपटू
3 WTC FINAL : न्यूझीलंडच्या यष्टीरक्षकाला विराटने दिल्या शुभेच्छा, व्हिडिओ होतोय व्हायरल