News Flash

ठरलं तर..! ‘ऐतिहासिक’ सामन्यासाठी ICCनं केली पंचांची निवड

'या' सामन्याकडं लागलय संपूर्ण जगाचं लक्ष

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि पंच

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील मॅच रेफरी आणि पंचांची नावे जाहीर केली आहेत. या सामन्यासाठी ख्रिस ब्रॉड मॅच रेफरी असतील. तर आयसीसी एलिट पॅनेलमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गफ मैदानावरील पंच असतील. रिचर्ड केटलबरो हे टीव्ही पंच असतील, तर अ‍ॅलेक्स व्हार्फ हे चौथे पंच असतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्प्टन येथे अंतिम सामना होणार आहे.

आयसीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (पंच व रेफरी) अ‍ॅड्रियन ग्रिफिथ म्हणाले, “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पंच आणि इतर सदस्यांची अनुभवी टीम जाहीर करण्यात आम्हाला आनंद झाला. या महामारीत हे सोपे काम नव्हते. अनेक वर्षांपासून ही मंडळी सातत्याने उत्कृष्ट काम करीत आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.”

हेही वाचा – WTC Final नंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळणार ‘ब्रेक’, मजा-मस्ती करण्यासाठी असणार २० दिवस

 

न्यूझीलंडचा बायो-बबल प्रवेश

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यानंतर न्यूझीलंडचा संघ १५ जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी असणाऱ्या बायो बबलमध्ये प्रवेश करेल. ३ जून रोजी भारताची टीम इंग्लंडला पोहोचली आहे. तर न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. दुसरा कसोटी सामना १४ जून संपणार आहे.

या सामन्यासाठी एक राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. या दिवसाचा वापर करण्यासंबंधीचा निर्णय मॅच रेफरी घेतील. सामना अनिर्णित किंवा टाय असल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जाईल.

हेही वाचा – ‘‘असं म्हणू नकोस, माझं मन…”, रवीचंद्रन अश्विननं घेतली मांजरेकरांची फिरकी!

भारत आणि न्यूझीलंड आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंडच्या हेड-टू-हेड आकडेवारीवर नजर टाकली तर टीम इंडियाचा यात वरचष्मा राहिला आहे. तिन्ही स्वरूपासह या दोघांमध्ये १८५ सामने झाले आहेत. टीम इंडियाने ८२, तर न्यूझीलंडने ६९ सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत ५९ कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारताने २१ तर न्यूझीलंडने १२ कसोटी सामने जिंकले आहेत. ११० एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने ५५ तर न्यूझीलंडने ४९ सामने जिंकल्या आहेत. या दोघांमध्ये १६ टी-२० सामने असून भारताने ६ तर न्यूझीलंडने ८ सामने जिंकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 5:32 pm

Web Title: wtc final richard illingworth and michael gough named on field umpires adn 96
Next Stories
1 WTC Final नंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळणार ‘ब्रेक’, मजा-मस्ती करण्यासाठी असणार २० दिवस
2 ‘‘असं म्हणू नकोस, माझं मन…”, रवीचंद्रन अश्विननं घेतली मांजरेकरांची फिरकी!
3 इंग्लंडचं चाललंय काय? निलंबित रॉबिन्सनच्या पर्यायी खेळाडूचेही वादग्रस्त ट्वीट होतायत व्हायरल!
Just Now!
X