आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे तासभर उशिरा सुरू झाला. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व मिळवले. या दिवशी रॉस टेलरला बाद करून मोहम्मद शमीने टीम इंडियासाठी तिसरे यश मिळवून दिले. पण, टेलरला बाद केलेल्या शमीपेक्षा शुबमन गिल चर्चेचा विषय ठरला. त्याने हवेत सूर मारत टेलरचा अप्रतिम झेल घेतला.

शमीच्या चेंडूवर रॉस टेलरने ऑफ साईडला फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या शुबमनने आपल्या उजव्या बाजूला सूर मारत चपळाईने हा झेल घेतला. शुबमनच्या या झेलचे सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक होत आहे.

हेही वाचा – WTC FINAL : एकही विकेट न घेणारा बुमराह ‘या’ कारणामुळे होतोय ट्विटरवर ट्रेंड!

 

 

 

 

 

उपाहारानंतर न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकात २४९ धावांवर संपुष्टात आला. मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज जास्त काळ तग धरू शकले नाहीत. त्याने ४ बळी घेतले, तर दीडशेपेक्षा जास्त चेंडू खेळणाऱ्या केन विल्यमसनने ४९ धावा करत संघाला आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडकडे आता ३२ धावांची आघाडी असून टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला  सुरुवात केली आहे.