01 March 2021

News Flash

‘द ग्रेट खली’चा सामना करणं सोप नव्हे; WWE सुपरस्टार सेथ रॉलिन्सने केली भारतीय रेसलरची स्तुती

"द ग्रेट खलीसारखा फायटर मी कधीही पाहिला नव्हता"

WWE सुपरस्टार सेथ रॉलिन्स हा रेसलिंग क्षेत्रताली एक नामांकित फायटर म्हणून ओळखला जातो. मिक्स मार्शल आर्टमध्ये पटाईत असलेल्या सेथने आजवर अनेक सुपरस्टार रेसलर्सला धुळ चारली आहे. परंतु हा वर्ल्ड चॅम्पियन फायटर भारतीय रेसलर द ग्रेट खलीसमोर खेळताना मात्र दोन पावलं मागेच राहणं पसंत करतो. लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सेथ रॉलिन्सने खलीसमोर उभं राहायला देखील भीती वाटते हे मान्य केलं.

तो म्हणाला, “द ग्रेट खली हा सात फुट उंच आणि धिप्पाड असा व्यक्ती आहे. त्याची आक्रमक फाईट शैली ही त्याला आणखी घातक करते. जो पर्यंत तो उभा आहे तो पर्यंत त्याला हरवणं जवळपास अशक्य आहे. त्याच्या हाताच्या पंजासमोर माझा हात एखादा लहान मुलासारखा वाटतो. त्याच्या महाकाय शरीरासमोर आपले सर्वसाधारण मूव्ह काम करत नाही. त्याला हरवायचं असेल तर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करावा लागतो. खलीसोबत खेळणं हा वेगळाच अनुभव असतो.” असं म्हणत सेथ रॉलिन्सने भारतील रेसलरची तोंड भरुन स्तुती केली. सोनी टेन १ आणि सोनी टेन ३ (हिंदी) या वाहिन्यांवर तुम्ही WWE सुपरस्टार्सला जबरदस्त अॅक्शन करताना पाहू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 2:10 pm

Web Title: wwe superstar seth rollins talk about the great khali in loksatta interview mppg 94
Next Stories
1 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा  : झ्वेरेव्ह, हॅलेपचे आव्हान संपुष्टात
2 जतलरण प्रशिक्षक आणि जीवरक्षक बेरोजगार
3 धोनीच्या स्थानासाठीची चुरस!
Just Now!
X