News Flash

WWE : मुंबईत रंगली TRYOUTS स्पर्धा; ८० भारतीयांची झाली निवड

२० महिलांची अंतिम पात्रता फेरीसाठी निवड

सामना विजेती कविता देवी

WWE च्या भारतातल्या पहिल्या वहिल्या TRYOUTS अर्थात खेळाडू निवडीचे आयोजन मुंबईच्या नेस्को येथे तयार केलेल्या खास रिंगणामध्ये २ ते ५ मार्च २०१९ दरम्यान करण्यात आले होते. भारतभरात तुफान लोकप्रिय असणाऱ्या या करमणूक प्रधान खेळांसाठी तब्बल ६० पुरुष आणि २० महिलांची अंतिम पात्रता फेरीसाठी निवड करण्यात आली.

या स्पर्धकांच्या उपस्थितीत या वेळी दोन शो सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. एरवी फक्त टीव्हीवर पाहायला मिळणारे WWEचे दोन सामने यावाळी स्पर्धकांना ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळाली. कविता देवी विरुद्ध जिनी संधू आणि रिंकू सिंग, सौरव गुर्जर विरुद्ध जीत रामा असे NXT Talent टीममधील २ सामने खेळवण्यात आले.

जीत रामा


कविता देवी

सामना विजेती कविता देवी

पाच वेळा WWE टॅग टीमचा मान मिळवलेल्या ‘द न्यू डे’ या टीममधील कोफी किंग्जटन, बिग ई आणि झेवियर वूड्स हेही या स्पर्धकांना उत्तेजन देण्यासाठी व TRYOUTS मध्ये त्यांची कामगिरी पाहण्यासाठी भारत दौऱ्यावर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 7:45 pm

Web Title: wwe talent tryouts in india shortlisted 80 wrestlers
Next Stories
1 धोनीसाठी वय हा मुद्दा गौण, विश्वचषकानंतरही संघात खेळू शकतो – सौरव गांगुली
2 Video : …म्हणून आफ्रिकेच्या फलंदाजाने ड्रेसिंग रूममध्ये रागाच्या भरात आपटली बॅट
3 IND vs AUS : धोनीचा मास्टरप्लॅन! …आणि कुलदीपने उडवला मॅक्सवेलचा त्रिफळा
Just Now!
X