महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या हीरक महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित राज्य मानांकन स्पर्धेत योगेश परदेशी, कमलेश करडेकर, मेधी मतकरी आणि संगीता चांदोरकर यांनी विजयी आगेकूच केली. महेंद्र तांबे, अनंत गायत्री, मैत्रेयी गोगटे आणि अनुपमा केदार यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
बिगरमानांकित कमलेश करडेने महेंद्र तांबेवर २५-१, २५-११ असा विजय मिळवला. अजीम शेखने अनंत गायत्रीचा ०-२५, २५-१८, २५-१५ असा पराभव केला. पंकज पवारने एकतर्फी लढतीत दत्तप्रसाद शेंबेकरला २५-१०, २५-४ असे नमवले. संदीप देवरुखकरने नरसिंगराव सकारीवर २५-१३, २५-२ अशी मात केली.
अनिल मुंढेने मनु बारियावर २५-८, २५-० असा विजय मिळवला. विश्वजीत भावेने शांतीलाल जितियावर २५-१२, ८-२५, २५-३ असा विजय मिळवला. हिदायत अन्सारीने जितेंद्र काळेचा २५-६, २५-१४ असा धुव्वा उडवला. महिलांमध्ये शिल्पा पळणीटकरने अनुपमा केदारवर २५-१४, १५-२५, २५-१ अशी मात केली. संगीता चांदोरकरने प्रीती खेडेकरला २५-६, ७-२५, २५-० असे नमवले. मेधा मतकरीने शुभदा नागावकरचा २५-१०, २५-० असा पराभव केला.
पुण्याच्या योगेश परदेशीने पाचव्या फेरीत ठाण्याच्या मुकेश डे याच्यावर २५-९, २५-० अशी सहज मात केली. मुंबईच्या राजेश गोहीलने मुंबईच्याच संतोष जाधवचे आव्हान २५-९, २५-८ असे परतवून लावले.