19 September 2020

News Flash

तुमच्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची वाट लागते आहे, मियाँदादने इम्रान खानला फटकारलं

देव झाल्यासारखे वागत आहात, राजकारणात येऊन तुम्हाला उत्तर देईन !

पाकिस्तानी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू जावेद मियाँदाद यांनी आपल्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारलं आहे. पाकिस्तान क्रिकेटची सध्या झालेली वाईट परिस्थिती इम्रान खान यांच्यामुळे झालेली आहे असा आरोप मियाँदाद यांनी केला आहे. खेळाविषयी कोणतीही माहिती नसलेल्या लोकांना इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर आणून बसवलं आहे, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट सध्या संकाटात असल्याचं मियाँदाद म्हणाले.

“PCB मधल्या एकाही अधिकाऱ्याला खेळाविषयी जराही माहिती नाही. मी इम्रान खान यांच्याशी याबद्दल बोलणार आहे. माझ्या देशासाठी जो योग्य नसेल त्याला मी सोडणार नाही. पाकिस्तानात असे अनेक गुणवान खेळाडू आहेत, ज्यांचं भविष्य उज्वल आहे. या खेळाडूंनी मजूर म्हणून काम करु नये इतकीच माझी इच्छा आहे. खेळाडूंना वाऱ्यावर सोडल्यानंतर आता पाक क्रिकेट बोर्ड आपल्या कर्मचाऱ्यांचीही काळजी घेऊ शकत नाहीये.” मियाँदाद आपल्या यू-ट्युब चॅनलवर देशांतर्गत क्रिकेटच्या परिस्थितीबद्दल बोलत होते.

मी तुमचा कर्णधार होतो, तुम्ही माझे कर्णधार नव्हतात. मी राजकारणात येईन आणि मग तुमच्याशी बोलेन. मी तुम्हाला नेहमी संधी देत आलेलो आहे, पण आता तुम्ही देव झाल्यासारखे वागत आहात. जसं काही या देशात तुम्हीच एक हुशार माणूस आहात असं तुमचं वागणं आहे. जसं काही पाकिस्तानमधून कोणताही माणूस ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात शिकायलाच गेला नाही. या देशातली लोकांची तुम्हाला काळजी नाही असंच दिसतंय, अशा शब्दांत मियाँदाद यांनी इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. पाकिस्तानकडून मियाँदाद यांनी १२४ कसोटी आणि २३३ वन-डे सामने खेळले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 1:43 pm

Web Title: you act like god like you are the only intelligent person in pakistan says javed miandad to imran khan psd 91
Next Stories
1 IPL चा पहिला आठवडा परदेशी खेळाडूंशिवाय?? इंग्लंड-ऑस्ट्रेलियात रंगणार महत्वाची मालिका
2 2021 T-20 WC : ICC चा बॅक-अप प्लान, करोनामुळे स्पर्धा न झाल्यास दोन देशांचे पर्याय तयार
3 एका दिग्गजाचा अस्त आणि नव्या ताऱ्याचा उदय, आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आहे खास
Just Now!
X