News Flash

IPL 2021 : “तू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहेस”, ‘त्या’ विधानावरुन मायकल क्लार्कने फिंचला सुनावले खडेबोल

फिंचला एकाही संघाने खरेदी न केल्याने मायकल क्लार्कने यापूर्वीही आश्चर्य व्यक्त केले होते...

यंदाच्या आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार व धडाकेबाज सलामीवीर अ‍ॅरॉन फिंचला एकाही संघाने विकत न घेतल्याचा मुद्दा गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. फिंचवर एकाही संघाने बोली न लावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने यापूर्वी आश्चर्य व्यक्त केले होते. आता पुन्हा एकदा क्लार्कने प्रतिक्रिया दिली आहे, पण यावेळी त्याने फिंचलाच एका विधानावरुन सुनावलंय.

आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने न खरेदी केल्यानंतर “बिग बॅश लिगमधील खराब कामगिरीमुळे आयपीएल लिलावात माझ्यावर बोली लागणार नाही याची मला अपेक्षा होती”, असं फिंच म्हणाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना क्लार्कने फिंचला सुनावलंय. “तू ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार आहेस, आयपीएलमध्ये प्रत्येक संघ तुला त्यांच्या ताफ्यात प्रयत्न करेल अशीच अपेक्षा तू ठेवायला पाहिजे”, असं क्लार्क म्हणाला.

“मी त्या दिवशीही म्हणालो होतो की एकाही आयपीएल संघाने त्याच्यावर बोली लावली नाही, आणि त्यावर मला हे अपेक्षित होतं असं तो म्हणतो. टी-२० प्रकारात तू ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहेस. प्रत्येक संघाला तू त्यांच्या सघात हवाय असाच विचार तू करायला पाहिजे”, अशा शब्दात क्लार्कने Big Sports Breakfast नावाच्या एका कार्यक्रमात बोलताना फिंचच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

फिंचला गेल्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्सकडून खेळताना आपली छाप पाडता आली नव्हती. त्यामुळे यावेळी लिलावात रॉयल चॅलेंजर्सने फिंचला रिलीज केले होते, पण एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 10:31 am

Web Title: you are the australian captain michael clarke slams aaron finch for his ipl comments sas 89
टॅग : IPL 2021
Next Stories
1 प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स यांच्या कारचा भीषण अपघात
2 गुलाबी चेंडूचे वळण कुणाकडे?
3 श्रेयसच्या शतकामुळे मुंबईचे ‘धवल’ यश!
Just Now!
X