01 March 2021

News Flash

युवा भारतीयांच्या तुलनेत तुम्ही अद्याप प्राथमिक शाळेतच; चॅपल गुरुजींनी ऑस्ट्रेलियाला सुनावलं

ग्रेग चॅपल यांनी ऑस्ट्रेलियाच्या आणि भारताच्या युवा खेळाडूंची तुलना केली आहे.

भारतीय संघानं लागोपाठ दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच पराभूत करत इतिहास रचला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या युवा ब्रिगेडनं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत २-१ नं लोळवलं. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या संघावर टीका केली आहे. यामध्ये आता आणखी एका दिग्गजाची भर पडली आहे. भारतीय संघाचे माजी कोच आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपल यांनी ऑस्ट्रेलियाच्या आणि भारताच्या युवा खेळाडूंची तुलना केली आहे.

भारतीय संघातील युवा खेळाडूच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया संघातील युवा खेळाडू अद्याप प्राथमिक शाळेतच असल्याचा टोला ग्रॅग चॅपल यांनी कांगारुंना घरचा आहेर दिला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी भारतीय संघाला २-१ असा अविश्वसनीय विजय मिळवून दिला. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर घेतलेल्या मेहनतीमुळेच हा विजय मिळवता आल्याचेही चॅपल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना सांगितले.

बीसीसीआयनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतेय. त्या तुलनेत ऑस्ट्रेलिया खूपच कमी पैसे खर्च करतेय. भारतीय संघाप्रमाणेच क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुंतवणूक करायला हवी. भारताच्या तरुण खेळाडूंनी ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणीच्या संघांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम पाच संघांपैकी एक आहे, यामध्ये कोणतीही शंका नसल्याचेही चॅपल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 12:09 pm

Web Title: young australian cricketers still in primary school compared to indian counterparts greg chappell nck 90
Next Stories
1 IND vs ENG : भारत की इंग्लंड, कसोटी मालिका कोण जिंकणार? ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंनं सांगितली भविष्यवाणी
2 शिखर धवन अडचणीत, ‘त्या’ फोटोंमुळं होऊ शकते कारवाई
3 Video : ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला….
Just Now!
X