News Flash

जेव्हा युसून खान प्रशिक्षकांच्या गळ्यावर सुरा ठेवतो…वाचा धक्कादायक प्रसंग

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात घडला होता प्रसंग

पाकिस्तानी संघातील खेळाडू आपल्या आक्रमक स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. गोलंदाजी आणि फलंदाजीत एककाळ गाजवणाऱ्या अनेक माजी पाकिस्तानी खेळाडूंना मैदानात आक्रमक होताना आपण पाहिलं आहे. पाकिस्तानी कसोटी संघाचा माजी फलंदाज युनूस खानबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युनूसने आपल्या कारकिर्दीत फलंदाजीविषयी टिप्स देणारे प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांच्या गळ्यावर सुरु ठेवला होता. खुद्द फ्लॉवर यांनी एका क्रिकेट पॉडकास्टमध्ये याबद्दलची माहिती दिली.

“युनूस खानला काही गोष्टी समजावून सांगणं खरंच कठीण जायचं. तो चांगला खेळाडू आहे यात काही वादच नाही. एकदा ब्रिस्बेनमध्ये कसोटी सामन्यादरम्यान मी नाश्ता करत असताना युनूसला फलंदाजीविषयी काही टिप्स द्यायला गेलो. पण त्याला माझा सल्ला पटला नाही, त्यानंतर अचानक त्याने सुरा उचलला आणि माझ्या गळ्यावर ठेवला. त्यावेळी प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी मध्ये पडून युनूसला शांत केलं. खरं पहायला गेलं तर माझी आकडेवारी ही त्याच्या जवळ जाणारीही नाही, पण सल्ला देणं हे माझं काम होतं. प्रशिक्षक म्हणून काम करताना असे प्रसंग तुम्हाला अधिक मजबूत करतात.” फ्लॉवर पॉडकास्टमध्ये बोलत होते.

त्या कसोटी सामन्यात युनूस खान पहिल्या डावात शून्यावर बाद झाला, यानंतर दुसऱ्या डावात त्याने ६५ धावा केल्या. फ्लॉवर सध्या श्रीलंकेच्या संघाला प्रशिक्षण देत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानी संघासाठी बोर्डाने युनूस खानची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 8:26 pm

Web Title: younis khan had a knife to my throat grant flower on being pakistan batting coach psd 91
Next Stories
1 ‘शतकातील मौल्यवान कसोटीपटू’चं सौराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून कौतुक
2 २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स?? कुमार संगकाराची ५ तास कसून चौकशी
3 Video : कहानी में ट्विस्ट! हार्दिकच्या ‘फ्लाईंग पुश-अप्स’ला विराटचं झकास उत्तर
Just Now!
X