पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनिस खान हा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानच्या मिसबाह उल हक व शाहीद आफ्रिदी यांनी यापूर्वीच विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. आपल्या निवृत्तीनंतर संघात नवोदित खेळाडूंना संधी मिळावी यासाठी युनिसने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी त्याला पाकिस्तान संघात संधी मिळाली नव्हती, त्याचवेळी त्याने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्तीचे व कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले होते.
युनिस निवृत्त झाला तर शोहेब मकसूद व असाद शफीक हे त्याची जागा घेण्यासाठी उत्सुक आहेत. युनिस या ३७ वर्षीय खेळाडूने आतापर्यंत ९६ कसोटी व २५९ एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 5:58 am