03 March 2021

News Flash

Youth Olympic : कुस्तीपटू सिमरनला रौप्यपदक

अमेरिकेच्या एमिली शिल्सनला सुवर्णपदक

रौप्यपदक विजेती सिमरन

अर्जेंटिनात सुरु असलेल्या Youth Olympic स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू सिमरनने 43 किलो फ्रिस्टाईल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत अमेरिकेच्या एमिली शिल्सनने सिमरनवर 11-6 ने मात करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. पहिल्याच सत्रात सिमरनने एमिलीला 9-2 अशी आघाडी घेण्याची संधी दिली, यामुळे अर्धा सामना सिमरनने पहिल्या सत्रातच गमावला होता. मात्र दुसऱ्या सत्रात सिमरनने एमिलीला चांगली लढत देत 4 गुणांची कमाई केली. मात्र एमिलीने सिमरनची झुंज वेळीच मोडून काढत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. युथ ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं स्पर्धेतलं हे पाचवं रौप्यपदक ठरलं. भारताची आणखी एक कुस्तीपटू मानसी मात्र पात्रता फेरीतूनच बाहेर पडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 2:24 pm

Web Title: youth olympics 2018 wrestler simran wins silver in womens freestyle 43kg category
Next Stories
1 सुलतान जोहर चषक – भारताच्या खात्यात रौप्यपदक, अंतिम फेरीत इंग्लंड विजयी
2 IND vs WI : भारताच्या डावावर कर्णधार जेसनचा ‘होल्ड’!
3 IND vs WI 2nd test HIGHLIGHTS : विंडीजवर मात करून भारताचे मालिकेवर निर्विवाद वर्चस्व
Just Now!
X