News Flash

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : जायबंदी दिव्यांशच्या जागी सिद्धेशचा समावेश

दक्षिण आफ्रिका येथे १७ जानेवारीपासून युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

जायबंदी अष्टपैलू दिव्यांश जोशीच्या जागी महाराष्ट्राच्या सिद्धेश वीरची भारतीय युवा संघात (१९ वर्षांखालील) निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका येथे १७ जानेवारीपासून युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नुकताच झालेल्या चौरंगी स्पर्धेत आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिव्यांशच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. भारतानेच या स्पर्धेचे विजेतेपद मिळवत विश्वचषकापूर्वी दमदार सराव करून घेतला.

भारतीय युवा संघ

प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, दिव्यांश सक्सेना, अथर्व अंकोलेकर, तिलक वर्मा, सिद्धेश वीर, शाश्वत रावत, शुभंग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, कुमार कुशग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2020 4:27 am

Web Title: youth world cup cricket tournament akp 94
Next Stories
1 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे सोनेरी यश
2 कोहली, स्मिथ यांच्याप्रमाणे छाप पाडण्याचे ध्येय -लबूशेन
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : बलाढय़ तमिळनाडूविरुद्ध मुंबईची प्रतिष्ठा पणाला
Just Now!
X