28 September 2020

News Flash

युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, साखरपुडा सोहळा संपन्न

घरच्यांच्या उपस्थितीत पार पडला छोटेखानी सोहळा

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. YouTuber धनश्री वर्मा आणि चहलचा घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली आहे. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे 1.5 million फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला आहे. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली असून तो लवकरच आयपीएलच्या तेराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 5:27 pm

Web Title: youtuber dhanashree verma gets engaged to cricketer yuzvendra chahal psd 91
Next Stories
1 मांजरीचं फिल्डींग स्किल पाहून सचिनही झाला अवाक, म्हणाला…ही तर जॉन्टी ऱ्होड्सलाही टक्कर देईल !
2 एलिस पेरी पुनरागमनासाठी सज्ज, चाहत्यांसाठी शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ
3 शोएब अख्तर म्हणजो, जसप्रीत बुमराह तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये फारकाळ खेळू शकणार नाही !
Just Now!
X