19 January 2018

News Flash

मुख्य फेरी गाठण्याचे युकी भांब्रीचे आव्हान कायम

युकीने यापूर्वी दोन वेळा या स्पर्धेत मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे.

पीटीआय, मेलबर्न | Updated: January 13, 2018 2:55 AM

युकीने स्पेनच्या कालरेस टबर्नरचा ६-०, ६-२ असा दणदणीत पराभव केला.

एकेरीत भारताचे आशास्थान असलेल्या युकी भांब्रीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील मुख्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. युकीने स्पेनच्या कालरेस टबर्नरचा ६-०, ६-२ असा दणदणीत पराभव केला. हा विजय नोंदवत त्याने पात्रता फेरीतील तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे. त्याची कॅनडाच्या पीटक पोलनस्कीशी गाठ पडणार आहे. हा सामना जिंकला तर युकीला मुख्य फेरीत स्थान मिळेल. २५ वर्षीय युकीने ५७ मिनिटांच्या सामन्यांमध्ये पासिंग शॉट्स व अचूक सव्‍‌र्हिस असा खेळ करीत टबर्नरचा सपशेल पाडाव केला. त्याने सहा वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला.

युकीने यापूर्वी दोन वेळा या स्पर्धेत मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. २०१५ मध्ये त्याला पहिल्या फेरीत अ‍ॅण्डी मरेकडून हार मानावी लागली होती. २०१६ मध्ये टॉमस बर्डीचने पहिल्या फेरीत युकीला हरवले होते.

First Published on January 13, 2018 2:55 am

Web Title: yuki bhambri beats carlos taberner in qualifying
  1. No Comments.