भारताच्या युकी भांब्रीने एटीपी चॅलेंजर स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. चौथ्या मानांकित युकीने एक तास आणि ११ मिनिटात ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनवर ६-२, ६-२ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट न गमावलेल्या युकीने दोनदा थॉम्पसनची सव्‍‌र्हिस भेदली. थॉम्पसनच्या ४१च्या तुलनेत युकीने ६१ गुण मिळवले. मी संयमी खेळ केला. माझ्या सव्‍‌र्हिसमध्ये सातत्य होते. याचा फायदा झाला. २३ वर्षीय युकी स्पर्धेतला एकमेव मानांकित खेळाडू शिल्लक आहे. पुढच्या फेरीत युकीसमोर रशियाच्या दानिल मेदवेदेवचे आव्हान असणार आहे.