News Flash

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : युकीचे आव्हान संपुष्टात

भारताचा युवा टेनिसपटू युकी भांबरीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या २८व्या मानांकित पोटिटो स्टारेसने युकीवर ६-३, १-६, ६-२ अशी

| January 9, 2014 03:27 am

भारताचा युवा टेनिसपटू युकी भांबरीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या २८व्या मानांकित पोटिटो स्टारेसने युकीवर ६-३, १-६, ६-२ अशी मात केली. पहिला गेम गमावल्यानंतर युकीने झुंजार खेळ करत दुसरा सेट जिंकून बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये स्टारेसने आपला खेळ उंचावत बाजी मारली. या पराभवासह ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या एकेरी प्रकारात खेळण्याचे युकीचे स्वप्न भंगले असले तरी दुहेरी प्रकारात मात्र तो खेळणार आहे. न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनसच्या साथीने तो खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 3:27 am

Web Title: yuki out of australian open qualifiers
Next Stories
1 ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी हॉकीपटूंचा मोर्चा
2 मुंबईच्या पहिल्या डावात ४०२ धावा; जहीरचा सामना करायला महाराष्ट्र सज्ज
3 बोपण्णा-कुरेशीची आगेकूच; पेस-स्टेपनाक पराभूत
Just Now!
X