22 October 2020

News Flash

“युवराजने मला रात्री फोन केला आणि म्हणाला तयार राहा”

वाचा नक्की घडलं तरी काय...

करोना विषाणूमुळे सर्वत्र हाहा:कार माजला आहे. करोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. परदेशातील काही ठिकाणी फुटबॉलच्या स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आल्या आहेत. पण सध्या तरी भारतात क्रिकेट किंवा इतर स्पर्धांना सुरूवात होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे घरी असलेले क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत आणि जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

भारताचा धडाकेबाज माजी युवराज सिंग याने लॉकडाउन काळात अनेकदा लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. विविध खेळाडूंशी संवाद साधताना त्याने काही प्रश्नांची उत्तरंदेखील दिली. मात्र नुकतीच युवराजच्या एका जवळच्या व्यक्तीने त्याचाबद्दलचा एक किस्सा सांगितला. युवराज आणि सुरेश रैना हे टीम इंडियासाठी अनेक वर्षे खेळले. दोघेही डावखुरे आणि मधल्या फळीतील फलंदाज असल्याने दोघेही एकाच संघाच वेळी संघात खेळण्याचा फारसा प्रसंग आला नाही, पण जेव्हा ते एकत्र खेळले तेव्हा त्या दोघांनी भारतीय संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात मदत केली. सुरेश रैनाने नुकताच समालोचक आकाश चोप्रा याच्याशी ऑनलाइन संवाद साधला, त्यावेळी त्याने एक भन्नाट किस्सा सांगितला.

“युवराजने मला कसोटी सामना सुरू होण्याच्या आदल्या रात्री फोन केला आणि मला म्हणाला की तू खेळायला तयार राहा. माझी तब्येत बरी नाहीये. तुला संघात समाविष्ट करण्याची अधिक शक्यता आहे कारण युवराजचं तेव्हा पोट बिघडलं होतं. म्हणून तो खेळला नाही. आधीच मी श्रीलंकेतील उष्ण वातावरणामुळे झोपू शकलो नव्हतो. त्यात यामुळे तर माझी झोप उडालीच. कारण त्यांच्या संघात खूप अनुभवी खेळाडू होते आणि माझ्यासाठी हा पदार्पणाचा सामना ठरणार होता. सुदैवाने आम्ही नाणेफेक हारलो आणि दोन दिवसांनंतर माझी फलंदाजी आली. पहिल्या दिवशी फलंदाजी करायची असती, तर मी वन डे पदार्पणाच्या सामन्यासारखाच शून्यावर बाद झालो असतो”, असे रैनाने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 12:47 pm

Web Title: yuvraj called at night and said be prepared suresh raina recalls test debut against sri lanka vjb 91
Next Stories
1 सगळं सुरळीत व्हायला किती वेळ लागेल? BCCI अध्यक्ष म्हणतात…
2 मला कर्णधार बनवण्यात धोनीची महत्त्वाची भूमिका – विराट
3 Hockey India मध्ये करोनाचा शिरकाव; दोन कर्मचाऱ्यांना लागण
Just Now!
X