News Flash

आनंदाची बातमी ! युवराज निवृत्ती मागे घेणार, पंजाबकडून स्थानिक क्रिकेट खेळण्यास उत्सुक

BCCI कडे मागितली रितसर परवानगी

भारतीय संघाचा माजी डावखुरा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी तयारी दाखवली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी युवराज पंजाबकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार झाला आहे. यासंदर्भात युवराजने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराजला पंजाबच्या संघाचा मेंटॉर कम खेळाडू अशी ऑफर दिली होती. पंजाब संघामधील तरुण खेळाडूंना युवराजच्या अनुभवाचा फायदा होईल असं काही अधिकाऱ्यांचं मत होतं. पंजाब क्रिकेट असोसिएशनची ही ऑफर युवराजने स्विकारलेली आहे.

“मी खरंतर स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली होती, पण मला क्रिकेट खेळायचं होतं यासाठी बाहेरील देशातील लिगमध्ये खेळण्यासाठी मी बीसीसीआयची परवानगी मागितली होती. पंजाब क्रिकेट असोसिएशनने केलेली विनंती मी नाकारु शकत नाही, म्हणून मी यावर सुमारे ३-४ आठवडे विचार केला. सरतेशेवटी मला पुनरागमन करण्याचा निर्णय योग्य वाटला.” युवराज Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

बीसीसीआयने युवराजला पुन्हा खेळण्याची परवानगी दिल्यास, तो पंजाब संघाकडून फक्त टी-२० क्रिकेट खेळेल. इतर स्पर्धांमध्ये मला सहभागी होता येणार नसल्याचंही युवराजने स्पष्ट केलंय. पंजाबच्या संघाला पुन्हा एकदा जुने दिवस दाखवून विजेतेपद मिळवून द्यायचं हे माझं ध्येय आहे. मी आणि हरभजन एकत्र खेळत असताना आम्ही हे करुन दाखवलं होतं, पण यानंतर तो योग जुळून येत नाहीये. यासाठी पुनरागमनाचा निर्णय घेतल्याचं युवराजने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 7:09 pm

Web Title: yuvraj singh aims to make comeback in domestic cricket writes to bcci psd 91
Next Stories
1 “क्रिकेटमध्ये युसूफ पठाण सचिनपेक्षाही मोठा हिरो बनू शकतो”
2 ICC T20 Rankings: पाकिस्तानच्या बाबरने गमावलं अव्वलस्थान, विराटला बढती
3 VIDEO: ‘सब स्पिन का बाप’! ‘हा’ चेंडू पाहून तुम्हीही हेच म्हणाल…
Just Now!
X