भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या मर्यादित षटकांच्या विभागात चमकदार कामगिरी केली. त्याच्या उत्कृष्ट योगदानामुळे भारतीय संघाने २००७चा टी-२० विश्वचषक आणि २०११चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. युवराज टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा खेळाडू होता, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये तो जास्त काळ संघात राहिला नाही. विस्डेन इंडियाने विचारलेल्या कसोटी क्रिकेटच्या प्रश्नाबाबत युवराज सिंगने एक मजेदार उत्तर दिले.

WISDENने निवडला भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ, धोनीला ठेवले संघाबाहेर

विस्डेन इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रेक्षकांना एक प्रश्न विचारला. ”तुमच्या म्हणण्यानुसार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने जास्त कसोटी सामने खेळले पाहिजे होते?”, असे विस्डेन इंडियाने विचारले. या प्रश्नावर उत्तन देताना युवराज म्हणाला, ”कदाचित मला पुढच्या जन्मी संधी मिळेल आणि हो, मला ७ वर्षात १२वा खेळाडू म्हणून राहायचे नाही.”

 

 

काही चाहत्यांनी या उत्तरावर युवराज सिंगची बाजू घेतली तर काहींनी त्यांच्या या टिप्पणीला विरोध केला. युवराजने २००३साली न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. युवीने ४० कसोटी सामने खेळले पण त्याला यात जास्त काही करता आले नाही. युवराज सिंग हा एक मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज होता, परंतु बहुतेक वेळेस तो कसोटी संघातून बाहेर राहिला.

युवीची कसोटी कारकीर्द

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली हे मातब्बर फलंदाज मधल्या फळीत उपस्थित असल्याने युवीला जास्त संधी मिळाल्या नाहीत. शिवाय, सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्याला कमी संधी मिळाल्या. युवराज सिंगने कसोटी कारकिर्दीत तीन शतके ठोकली. ही तीनही शतके पाकिस्तानविरूद्ध केली होती. युवराज सिंगने ४० कसोटी सामन्यांत १९०० धावा केल्या.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार झहीर खान