करोना व्हायरसने सध्या थैमान घातले आहे. जगभरात भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत. नुकताच भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने पीटीआयला ऑनलाइन मुलाखत दिली. त्यात त्याने विविध प्रश्नांची उत्तर दिली.

“गांगुलीला उकसवणं अगदी सोपं”; माजी खेळाडूने सांगितली मैदानावरील भांडणाची आठवण

युवराज सिंगचा आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वात जलद म्हणजेच १२ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. तो विक्रम अद्याप कोणताही फलंदाज मोडू शकलेला नाही. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्याला हाच प्रश्न विचारण्यात आला की तुझा सर्वात जलद टी २० अर्धशतकाचा विक्रम कोण मोडेल असं तुला वाटतं. यावर युवराज म्हणाला, “मला वाटतं की हार्दिक पांड्या माझा सर्वात जलद टी २० अर्धशतकाचा विक्रम मोडीत काढू शकेल. त्याच्यात मी एक उत्तम अष्टपैलू खेळाडू पाहिला आहे. फक्त त्याला योग्यरितीने मार्गदर्शन करणं गरजेचं आहे.”

“विराट सर्वोत्तम; बाबर आझम आसपासही नाही”; पाकिस्तानी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

दरम्यान, भारताचा तडाखेबाज फलंदाज लोकेश राहुल याने ट्विटरवर प्रश्नोत्तरांचं सत्र घेतलं. त्यात अनेकांनी त्याला प्रश्न विचारले. त्यात पवन कुमार या युझरने त्याला प्रश्न विचारला की १४ चेंडूत IPL मधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम तुझ्या (राहुल) नावावर आहे. पण आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील १२ चेंडूत सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम युवराजच्या नावे आहे. तो विक्रम कोण तोडू शकेल असं तुला वाटतं? त्यावर लोकेश राहुलने दमदार उत्तर दिलं. राहुल म्हणाला की युवराजचा सर्वात जलद टी २० अर्धशतकाचा विक्रम मीच मोडेन… या उत्तरानंतर त्याने चिडवण्याचा इमोजीदेखील वापरला.