News Flash

क्रिकेटपटू युवराज सिंग विरोधात पोलिसात तक्रार दाखल

वाचा नक्की काय आहे प्रकरण

भारतचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा कायम चर्चेत असतो. कधी त्याने केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे, तर कधी त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे. करोनाच्या लॉकडाउनमध्ये युवराज सोशल मीडियावर अनेकदा लाइव्ह आला. पण सोमवारी मात्र रोहित शर्मासोबत लाइव्ह येणं त्याला महागात पडलं. रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटदरम्यान युवराज सिंगने जातीवाचक आक्षेपार्ह शब्द उच्चारला. त्या शब्दामुळे एका ठराविक समाजाचा अपमान झाल्याचे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे सोमवार रात्रीपासूनच ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंड झाला. युवराज सिंगने माफी मागावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली. त्यातच युवराज विरूद्ध या प्रकरणी पोलीसात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.

झी न्यूजच्या वृत्तानुसार, दलित समाजातील मानवाधिकार कार्यकर्ते अॅडव्होकेट रजत कळसन यांनी युवराज विरोधात हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातील हंसी गावात तक्रार दाखल केली आहे. कळसन यांनी तक्रार दाखल केल्यावर रोहितवरही निशाणा साधला आहे. युवराजने केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर रोहितने विरोध दर्शवायला हवा होता, परंतु तो हसला आणि त्यावर सहमत असल्याचे दर्शवले. अशा शब्दात कळसन यांनी रोहितवरही निशाणा साधला. याशिवाय, पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर युवराजच्या अटकेचीही त्यांनी मागणी केली. तसेच प्रकरणाचे रेकॉर्डींग असलेली सीडी आणि कागदपत्रेही पोलिसांच्या ताब्यात दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.

लाइव्ह सत्रादरम्यान युवीने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना ‘भंगी’ असं संबोधलं. युवराजच्या या शब्दाचा अयोग्य वापर झाल्यावर अनेक यूजर्सनी युवीवर टीका केली. युवराज सिंग याने लॉकडाउनदरम्यान अनेकदा लाइव्ह चॅटच्या माध्यमातून खेळाडू आणि चाहत्यांशी संवाद साधला. विविध खेळाडूंशी संवाद साधताना त्याने काही प्रश्नांची उत्तरंदेखील दिली. रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्यामध्ये लाइव्ह चॅट सुरू होता. त्यावेळी रोहित शर्मा म्हणला की, सर्वजण निवांत आहे. चहल, कुलदीपही ऑनलाइन आले आहेत. त्यावर बोलताना युवराजने मस्करीत चहलबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारला. त्यावर रोहितनेही हसत हसत तो विषय सोडून दिला. त्यानंतरच नेटकऱ्यांनी युवराजला धारेवर धरत #युवराज_सिंह_माफी_मांगो अशी मागणी ट्विटरवरून केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 5:13 pm

Web Title: yuvraj singh police complaint registered over casteist comment against yuzvendra chahal bhangi word inappropriate use vjb 91
Next Stories
1 अनुष्काच्या फोटोवर विराटने केली ‘ही’ कमेंट
2 Video : Ball of the Century! पाहा शेन वॉर्नचा भन्नाट स्पिन
3 पुन्हा क्रिकेटचा थरार! ५०० प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार टी २० स्पर्धा
Just Now!
X