षटकारांचा बादशहा युवराज सिंग सध्या संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेतो आहे. सरावासाठी ज्याप्रमाणे तो नेट प्रॅक्टिसवर भर देतो, त्याप्रमाणेच तो सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच त्याने क्रिकेटच्या मैदानातील व्हायरल झालेला एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर केला. त्यानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेटचा सामना सुरु असल्याचे दिसते. यात गोलंदाजाने एका फलंदाजाला निर्धाव चेंडू टाकल्यानंतर पंचाचा उतावळेपणा युवराजला चांगलाच भावल्याचे दिसते. व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही देखील अवाक् होऊ शकता.

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा पंचांकडून चुकीच्या पद्धतीने फलंदाजाला बाद दिल्याचे पाहायला मिळते. युवराजने असा किस्सा अनेकदा मैदानावर अनुभवलाही असेल. मात्र, त्याने शेअर केलेल्या व्हिडिओत फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण यांच्यानंतर पंचांनी दिलेला निर्णय थक्क करुन सोडणारा असाच आहे.
गोलंदाजाने स्टंप्सपासून दूर टाकलेला चेंडू फलंदाजाने यष्टिरक्षकाच्या हाती सोडून दिला आहे. या चेंडूवर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण यांनी कोणतेही अपील केल्याचे पाहायला मिळत नाही. मात्र, पंच फलंदाजाला बाद ठरवून रिकामे होतात. विशेष म्हणजे पंचांनी बाद दिल्यानंतर फलंदाजही कोणताही वाद न घालता मैदान सोडताना दिसतो.

युवराज सिंग बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. ३० जून २०१७ ला युवीने वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता. या सामन्यात त्याने ५५ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीनं ३९ धावांचे योगदान दिलेल होते. तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी निश्चितच उत्सुक असेल.

https://www.instagram.com/p/BbZlZ0FH-cX/