News Flash

पंतप्रधानांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी युवराज सिंग संसदेत

३० नोव्हेंबरला चंदीगढ येथील एका गुरूद्वारामध्ये युवराजचे लग्न होणार आहे.

२ डिसेंबरला गोव्यात युवराजचा विवाह समारंभ पार पडल्यानंतर ७ डिसेंबरला एका सेव्हन स्टार हॉटेलमध्ये शानदार रिसेप्शनही होईल

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग येत्या ३० नोव्हेंबरला अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. युवराजच्या लग्नसोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. युवराज आणि कुटुंबिय देखील लग्नसोहळ्याची जोरदार तयारी करत आहेत. देशात सध्या नोटाबंदीच्या निर्णयावरून वादळ उठलेले असताना संसदेत गोंधळाचे वातावरण आहे. पण या गोंधळाच्या वातावरणात देखील युवराज सिंग आज संसद परिसरात दिसला. युवराजच्या हातात त्याच्या लग्नाच्या पत्रिका होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तो आपल्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आला होता. येत्या ३० नोव्हेंबरला चंदीगढ येथील एका गुरूद्वारामध्ये युवराजचे लग्न होणार आहे. याशिवाय, २ डिसेंबरला हिंदू प्रथेनुसार गोव्यामध्ये ते पुन्हा विवाहबद्ध होणार आहेत. गोव्यातील हा सोहळा खूप शाही थाटात असणार आहे. नुकेतच ११ नोव्हेंबर रोजी हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला होता.

२ डिसेंबरला गोव्यात युवराजचा विवाह समारंभ पार पडल्यानंतर ७ डिसेंबरला एका सेव्हन स्टार हॉटेलमध्ये शानदार रिसेप्शनही होईल. या रिसेप्शनला राजकारणी, खेळाडू तसेच बॉलीवूड कलाकार उपस्थित राहणार आहेत. नुकतेच युवराजने डिनर पार्टी देखील दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 3:39 pm

Web Title: yuvraj singh reached parliament to meet pm narendra modi to give his wedding card
Next Stories
1 VIDEO: ‘बेवफा’ सोनमवर कपिल देव आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण म्हणतात..
2 VIDEO: अवघ्या पाच वर्षांचा रुद्रप्रताप १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळतो तेव्हा..
3 नोटाबंदीवर सेहवाग म्हणतो, बदल एकटा माणूस घडवतो, विवाहित पुरुष फक्त…
Just Now!
X