नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केलेल्या युवराज सिंगने ग्लोबल टी२० कॅनडा या टी-२० लीगमध्ये खेळताना जुन्या दिवसांची आठवण करुन देणारा खेळ केला. युवराजच्या खेळीमुळे त्याच्या टोरांटो नॅशनल्स संघाला इडमॉन्टॉन रॉयल्स या संघाचा सामन्यामध्ये दोन बळी राखून विजय झाला. या सामन्यामध्ये युवराजने मुळचा पाकिस्तानी असणाऱ्या शादाब खानला लगावलेला षटकार चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
टोरांटो नॅशनल्स आणि इडमॉन्टॉन रॉयल्स संघांमधील सामन्यातील एक षटकाचा खेळ पावसामुळे कमी करण्यात येऊन १९ षटकांचा समाना खेळवण्यात आला. १९ षटकांमध्ये १९२ धावांचा पाठलाग करताना युवराज खेळत असलेल्या नॅशनल्स संघाची सुरवात चांगली झाली नाही. संघाचे दोन्ही सलामीवीर २९ धावांवर तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार युवराज सिंग दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरीच क्लासने नॅशनल्सच्या डावाला गती मिळवून दिली. तिसऱ्या गड्यासाठी त्यांनी ५६ धावांची जलद भागीदारी केली. त्यामुळे नॅशनल्सचा विजयाच्या आशा कायम राहिल्या.
युवराजने २१ चेंडूमध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या. मात्र युवराजने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली अन् बेन कटींगने त्याला बाद केले. मात्र युवराजने केलेल्या फटकेबाजीने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. पाकिस्तानचा लेग स्पीनर गोलंदाज शादाब खानच्या गोलंदाजीवर युवराजने एक सुंदर मनगटी फटका मारत थेट षटकार लगावला. मीड विकेटवरुन युवराजने मारलेल्या या षटकाराची नेटवर चांगलीच चर्चा झाली. तुम्हीच पाहा युवीचा हा भन्नाट षटकार…
35 in 21 which include 3 sixes and 3 fours as well.
Loved watching him bat after so long #GLT20 #GlobalT20Canada #YuvrajSingh @YUVSTRONG12 @GT20Canada @TorontoNational— Sidak Singh Saluja (@SIDAKtweets) July 27, 2019
युवराज पाठोपाठ नॅशनल्सचा पोलार्डही अवघ्या दोन धावा करुन तंबूत परल्यानंतर संघाची अवस्था चार बाद ८८ अशी झाली होती. त्यानंतर नॅशनल्सच्या डावाची चांगलीच पडझड झाली. १४ षटकांमध्ये १२५ ला सात गडी तंबूत अशी एका क्षणला युवराजच्या संघाची स्थिती होती. मात्र मनप्रित गोनीने अवघ्या १२ चेंडूंमध्ये ३३ धावांची धडाकेबाज खेळी केली. गोनी सतराव्या षटकामध्ये बाद झाला. पण सलमान नझर आणि मार्ग मॉन्टफोर्ट यांनी नॅशनल्सला १८ व्या षटकामध्ये दोन गडी राखत विजय मिळवून दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 29, 2019 10:08 am