07 March 2021

News Flash

युवराज वाढदिवस साजरा करणार नाही, कारण वाचून तुम्हाला वाटेल अभिमान

वडिलांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याचा आज ३९ वा वाढदिवस आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं युवराजनं ट्विट करत सांगितलं आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात अशी इच्छाही त्यानं व्यक्त केली आहे. शिवाय वडील योगराज सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे युवराजनं स्पष्ट केलं आहे. यामध्ये युवराज म्हणतोय की, ‘शेतकरी हे आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो. आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून मार्ग निघावा अशी माझी इच्छा आहे.’

वडिलांनी केलेले वक्तव्यही निराशजनक असल्याची प्रतिक्रिया युवराजनं यावेळी दिली आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. योगराज सिंह यांच्या वक्तव्याशी माझा कोणताही संबंध नाही. त्यांचं ते व्यक्तगत मत आहे. त्याच्याशी मी सहमत नाही.

काय म्हणाले होते योगराज सिंह?
“हे हिंदू गद्दार आहेत. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली,” असं वादग्रस्त वक्तव्य योगराज सिंग यांनी एका भाषणात केलं होतं. त्याचं हे भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसंच सध्या ट्विटरवर ‘Arrest Yograj Singh’ हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 10:12 am

Web Title: yuvraj singh supports farmers in birthday post distances himself from father yograjs views nck 90
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाला धक्का; सलामी फलंदाज पहिल्या कसोटी सामन्यातू बाहेर
2 AUS vs IND: ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात कनकशन नियमांनुसार बदलला खेळाडू
3 टोक्यो ऑलिम्पिकचा खर्च वाढता वाढे!
Just Now!
X