बांगलादेशविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारताने विजयासाठी दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १४४ धावांपर्यंत मजल मारु शकला. दीपकने ३.२ षटकांत ७ धावा देऊन ६ बळी घेतले होते. या सामन्यात दीपकने हॅटट्रीकही नोंदवली.
अवश्य वाचा – ICC T20I Ranking – दीपक चहरची क्रमवारीत मोठी झेप
भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदवणारा चहर पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यावेळी चहरने युजवेंद्र चहलसह अनेकांचा विक्रम मोडला. सामन्यानंतर chahal tv कार्यक्रमात चहलने श्रेयस अय्यर आणि दीपक चहर यांना बोलतं केलं. यावेळी गमतीमध्ये, दीपक चहरनेआपलाच विक्रम मोडल्याने, कसला निर्लज्ज माणूस आहेस रे ! अशी कोपरखली चहलने लगावली.
WATCH: Hat-trick of sixes, Hat-trick of wickets & a card trick to top it up. This is yet another Chahal TV special. @deepak_chahar9 @ShreyasIyer15 @yuzi_chahal – by @28anand
Full Video here https://t.co/2Ni3uCykZT pic.twitter.com/HsBGoK0CHf
— BCCI (@BCCI) November 11, 2019
भारतीय संघाच्या कामगिरीवर कर्णधार रोहित शर्माही खुश झाला असून त्याने अखेरच्या सामन्यात विजयाचं श्रेय गोलंदाजांना दिलं आहे. दरम्यान, टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १४ नोव्हेंबरपासून इंदूरच्या होळकर मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
अवश्य वाचा – भारताच्या मालिका विजयावर कर्णधार रोहित खुश, गोलंदाजांना दिलं श्रेय
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 10:50 am