भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला.
भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग याने युजवेंद्र चहल-धनश्री जोडीला त्याच्या स्टाइल ‘हटके’ शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सलामीवीर रोहित शर्मानेदेखील भन्नाट फोटो शेअर करत त्याचं अभिनंदन केलं. या आणि अशा अनेक शुभेच्छांबद्दल युजवेंद्र चहलने साऱ्यांचे आभार मानले. त्याने त्याचा आणि धनश्रीचा एक फोटो शेअर केला. त्या फोटोखाली कॅप्शन लिहिले, “तुम्ही आम्हा उभयतांना दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यासाठी आम्ही तुम्हा सर्वांचे ऋणी आहोत. असेच कायम प्रेम असू द्या.”
दरम्यान, धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबर पैकी एक मानली जाते. तिच्या यू-ट्युब चॅनलचे १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता. अनलॉक काळात चहलने सरावासाठी सुरुवात केली असून तो लवकरच IPL 2020मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 4:09 pm