News Flash

IND vs AUS : युझवेंद्र चहलचा बळींचा षटकार, ऐतिहासीक कामगिरीशी बरोबरी

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ केला गारद

कुलदीप यादवच्या जागी तिसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघात जागा मिळालेल्या युझवेंद्र चहलने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. चहलने ऑस्ट्रेलियाच्या 6 गड्यांना माघारी धाडत, ऑस्ट्रेलियात वन-डे सामन्यात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. चहलने भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. 2004 साली मेलबर्नच्या मैदानावर अजित आगरकरने 42 धावांमध्ये 6 गडी घेतले होते. यानंतर आज 15 वर्षांनी चहलने याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

याचसोबत चहलने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या लेगस्पिनर्सच्या यादीतही स्थान पटकावलं आहे.

चहलने केलेल्या माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 230 धावांमध्ये आटोपला. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारने 2-2 बळी घेत चहलला मोलाची साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 1:03 pm

Web Title: yuzvendra chahal records joint best bowling figures in australia
Next Stories
1 सचिन तेंडुलकरनं गौरवलेल्या या मुंबईच्या क्रिकेटपटूवर तीन वर्षांसाठी बंदी
2 आयपीएलसाठी हार्दिक-लोकेश राहुलला परवानगी द्या !
3 IND vs AUS : ऑस्ट्रेलियन कर्णधाराला जाळ्यात अडकवत भुवनेश्वर कुमारची अनोखी हॅटट्रीक
Just Now!
X