News Flash

फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलच्या आई-वडिलांना करोनाची लागण

दोघांमध्ये गंभीर लक्षणे असल्याची चहलच्या पत्नीची माहिती

चहल कुटुंब

भारतात करोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती अजूनही अतिशय भयावह आहे. या विषाणूपासून क्रिकेटविश्वही दुरावलेले नाही. भारतीय संघाचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल यांचे वडील करोनामुळे त्रस्त असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय चहलच्या आईलाही करोनाची लागण झाली असून घरीच तिच्यावर उपचार सुरू आहेत. चहलची पत्नी धनश्रीने ही माहिती दिली.

 

”माझी सासू आणि सासरे यांना करोनाची लागण झाली आहे आणि मी रुग्णालयात वाईट परिस्थिती पाहिली आहे. दोघांमध्ये गंभीर लक्षणे आढळून आली आहेत. सासूवर घरी उपचार केले जात असून सासरे रुग्णालयात आहेत. माझ्याकडून लक्ष ठेवले जात असून आपण सर्व घरी राहून कुटुंबाची काळजी घ्या”, असे धनश्रीने इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये सांगितले.

चहलची करोनाग्रस्तांसाठी मदत

भारतात करोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. अशा परिस्थितीत मदत करण्यासाठी अनेक मदत निधीची स्थापना केली जात आहे. देशात करोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य विभागाला सुविधा पुरविणे कठीण होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी एक मदत निधी उभारला. चहलने पुढे येत या मदतनिधीला ९५,००० रुपयांची देणगी दिली. हरियाणाचा हा लेगस्पिनर कोहलीचा जवळचा मानला जातो. २०१४च्या आयपीएल हंगामापासून हे दोघेही एकत्र आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 7:23 pm

Web Title: yuzvendra chahals father hospitalized after tests corona positive adn 96
Next Stories
1 भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रमेश पोवार
2 टीम इंडियाच्या ‘प्रमुख’ खेळाडूने घेतली करोना लस
3 माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांचा करोनाला ‘स्मॅश’!
Just Now!
X