News Flash

VIDEO: ओमानच्या मक्सूदने टिपलेला थरारक झेल

मस्कूदच्या या उल्लेखनीय क्षेत्ररक्षणाची दखल क्रिकेट चाहत्यांनी घेतली.

IRE v OMA: मक्सूदने टिपलेल्या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीला सुरूवात झाली असून आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात ओमानने धक्कादायक विजय प्राप्त केला. सामन्यात ओमानच्या झिशान मस्कूदने जबरदस्त झेल टिपून क्रिकेटमधील मातब्बर संघांना आपल्या क्षेत्ररक्षणाची झलक दाखवून दिली. मक्सूदने हवेत झेप घेत एका हाताने आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगचा अप्रतिम झेल टिपला. मस्कूदच्या या उल्लेखनीय क्षेत्ररक्षणाची दखल क्रिकेट चाहत्यांनी घेतली. त्याने टिपलेल्या झेलचा व्हिडिओ  सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, धरमशालाच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात ओमानने दोन विकेट्स आणि एक चेंडू राखून धक्कादायक विजयाची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:57 pm

Web Title: zeeshan maqsood took an amazing one handed catch
टॅग : T20
Next Stories
1 बांगलादेशची नेदरलँड्सवर मात
2 भारतच प्रबळ दावेदार -मॉर्गन
3 ओमानचा आर्यलडवर थरारक विजय
Just Now!
X