आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्यांना कमाईच्या स्वरुपात बक्कळ पैसा मिळतो, असा समज सर्वांना असतो. क्रिकेटव्यतिरिक्त जाहिरातबाजी, प्रमोशन इत्यादी स्वरुपातही अनेक क्रिकेटपटू पैसे कमावतात. सध्याच्या युगात क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला, तरी तो आयपीएलसारख्या टी-२० लीगमधूनही चांगली कमाई करू शकतो. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अशा क्रिकेट खेळणार्‍या देशांमधील खेळाडूंकडे खूप पैसे आहेत. परंतु झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि नेपाळसारख्या छोट्या देशांचे खेळाडूही क्रिकेट खेळतात, पण ज्यांना जास्त पैसे कमावता येत नाहीत. त्यामुळे अशा क्रिकेटपटूंच्या आर्थिक विवंचनेच्या चर्चा समोर येतात. असेच काहीसे झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्लच्या बाबतीत घडले आहे.

पुढच्या जन्मी मला १२वा खेळाडू म्हणून राहायचे नाही – युवराज सिंग

रायन बर्लला क्रिकेट खेळण्यासाठी आर्थिक पेच सहन करावा लागत आहे. बर्लकडे प्रत्येक सामना खेळण्यासाठी शूजही नाहीत. त्यामुळे प्रायोजक (स्पॉन्सर) मिळण्यासाठी त्याने सोशल मीडियावर आवाहन केले आहे. बर्लने अलीकडेच ट्विटरवर एक फोटो शेअर केला, यात त्याचे फाटलेले शूज दिसून आले.

 

ट्विटरवर आपली समस्या स्पष्ट करताना बर्ल म्हणाला, “आम्हाला प्रायोजक मिळेल का, जेणेकरून प्रत्येक मालिकेनंतर आम्हाला आमचे शूज चिकटवावे लागणार नाहीत.” असे बरेच क्रिकेट खेळणारे देश आहेत, जेथे त्यांच्या खेळाडूंना जास्त पैसे मिळत नाहीत. झिम्बाब्वे त्या देशांपैकी एक आहे. इथले खेळाडू जगातील कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळतात, पण जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा अडचणी उद्भवतात. शिवाय, असे अनेक क्रिकेट बोर्ड आहेत, जे आपल्या खेळाडूंना वेळेवर पगार देण्यास सक्षम नाहीत. श्रीलंकेचे खेळाडू आणि बोर्ड यांच्यात सध्या वेतनाबाबत बराच गदारोळ सुरू आहे.

मोहम्मद अझरुद्दीनने दाखवली ‘ती’ बॅट, जिच्यामुळे क्रिकेटविश्व झाले होते थक्क!