विश्वनाथन आनंदने दमदार पुनरागमन करताना झुरिच चेस चॅलेंज बुद्धिबळ स्पध्रेच्या पहिल्याच फेरीत अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनला पराभवाचा धक्का दिला आहे. पहिल्या फेरीतील अन्य दोन लढती बरोबरीत सुटल्या.
अॅलेक्सी शिरोव्हने बर्लिन बचावपद्धतीचा वापर करीत व्लादिमिर क्रामनिकला शह देण्याचा प्रयत्न केला. क्रामनिकची शिरोव्हविरुद्धची आतापर्यंतची कामगिरी चमकदार असली तरी त्याने बरोबरीत समाधान मानले. हिकारू नाकामुराने हॉलंडच्या अनिश गिरीला बरोबरीत रोखले. या स्पध्रेच्या चार फेऱ्या बाकी असून, अरोनियन आत्मविश्वासाने कामगिरी सुधारेल, अशी अपेक्षा आहे. आनंदची पुढील फेरीत गिरीशी गाठ पडणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 3:40 am