शार्लोट (उत्तर कॅरोलिना) : कोलंबियाने दमदार कामगिरी सुरू ठेवताना तुल्यबळ उरुग्वेला १-० असे पराभूत करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता जेतेपदासाठी कोलंबियाची लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाशी रविवारी गाठ पडेल. उरुग्वेचा संघ तिसऱ्या स्थानासाठी कॅनडाचा सामना करेल. कोलंबियाने यापूर्वी २००१ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक आणि धसमुसळा खेळ पाहायला मिळाला. या सामन्यात सात खेळाडूंना पिवळी, तर एकाला लाल कार्ड दाखवण्यात आले. दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये धक्काबुक्कीही झाली. कोलंबियाचे सामन्याच्या सुरुवातीपासूनच गोल करण्याचे प्रयत्न सुरू होते. ३९व्या मिनिटाला कर्णधार हामेस रॉड्रिगेझच्या कॉर्नर किकला जेफर्सन लेर्माने गोलजाळीची दिशा देत कोलंबियाला १-० असे आघाडीवर नेले. लेर्माचा हा स्पर्धेतील दुसरा गोल ठरला. रॉड्रिगेझने या स्पर्धेत आतापर्यंत सहा गोलसाहाय्य (असिस्ट) नोंदवले आहेत. कोलंबियाने मध्यंतरापर्यंत आपली आघाडी कायम राखली.

हेही वाचा >>> वसई : रणजीपटू सुरेश देवभक्त यांचे निधन

उत्तरार्धात उरुग्वेकडून गोल करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी अनुभवी आघाडीपटू लुईस सुआरेझला मैदानावर उतवण्याचा प्रशिक्षक मार्सेलो बिएल्सा यांनी निर्णय घेतला. सुआरेझ सामन्याच्या ६६व्या मिनिटाला मैदानात आला आणि ७१व्या मिनिटाला त्याचा फटका गोलपोस्टच्या बाजूने गेला. यानंतर कोलंबियाने उरुग्वेला गोल करण्यापासून रोखले व अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.

सामन्यानंतर चाहते आणि खेळाडूंत जुंपली…

सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित दोन्ही संघांचे चाहते, तसेच कोलंबियाचे चाहते आणि उरुग्वेचे खेळाडू यांच्यात वाद निर्माण झाला. तणावपूर्ण सामन्यानंतर उरूग्वे संघाच्या मागे बसलेल्या चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला. स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांमध्ये ९० टक्के कोलंबिया संघाचे पाठीराखे होते. चाहत्यांच्या वादात दोन्ही गटांकडून एकमेकांवर पेय फेकण्यात आली. यानंतर आघाडीपटू डार्विन नुनेजसह उरुग्वेचे काही खेळाडू स्टँडमध्ये गेले. नुनेज कोलंबियाच्या एका चाहत्याला मारत असल्याची ध्वनिचित्रफीतही समोर आली. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दहा मिनिटे लागली.