आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील २३ वा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांअखेर ८ गडी बाद १३६ धावा केल्या. यादरम्यान भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना श्रीचरणीने बांगलादेशला सुरुवातीलाच मोठा धक्का देत सलामीवीर दिलाराला बाद करत माघारी धाडलं. या डावात तिने २ गडी बाद केले. यादरम्यान तिच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

श्रीचरणीने सुरुवातीलाच विकेट घेऊन भारतीय संघाला सुरुवात करुन दिली. या डावात तिने ४ षटकात अवघ्या २१ धावा खर्च करुन बांगलादेशच्या २ फलंदाजांना माघारी धाडलं. यासह ती भारतासाठी एकाच टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाजी ठरली आहे. श्रीचरणीने या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना १२ गडी बाद केले आहेत. याआधी हा रेकॉर्ड पुनम यादवच्या नावावर होता.पुनम यादवने २०२० मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत १० गडी बाद केले होते. तर डियाना डेव्हिडने २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत गोलंदाजी करताा ९ गडी बाद केले होते. तर पुनम यादव २०१४ आणि २०१८ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाज होती. दोन्ही वेळेस तिने सर्वाधिक ८-८ गडी बाद केले होते. तर राधा यादवने २०१८ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत ८ गडी बाद केले होते.

भारतासाठी एकाच टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

१२* – श्री चरणी (२०२६ मध्ये)

१० – पूनम यादव (२०२० मध्ये)

९ – डायना डेव्हिड (२०१० मध्ये)

८ – पूनम यादव (२०१४ मध्ये)

८ – पूनम यादव (२०१८ मध्ये)

८ – राधा यादव (२०१८ मध्ये)

बांगलादेशने केल्या १३७ धावा

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून जुएरिया फर्दोसने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. तर कर्णधार निगार सुलतानाने ३२ धावा केल्या.त्यानंतर शोर्ना अख्तरने १३ धावा केल्या. अफगाणिस्तानला २० षटकांअखेर १३७ धावा करता आल्या.