२२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर अशा ४० दिवसांच्या ऐतिहासिक न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचे तिन्ही प्रकारातील संघ जाहीर झाले आहेत. ५ टी२०, ५ वनडे आणि २ टेस्ट असा भारतीय संघाचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. १२ सामन्यांसाठी मिळून भारताचे तब्बल ३७ खेळाडू किवी दौऱ्यात खेळणार आहेत.
टी२० मालिकेसाठी नेतृत्व अर्थात श्रेयस अय्यरकडे असणार आहे. वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी शुबमन गिल कर्णधार असेल तर उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयसकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. टेस्ट सीरिजसाठी शुबमनकडेच संघाची सूत्रं असतील.
मुख्य दौऱ्याला समांतर पद्धतीने भारतीय अ संघही न्यूझीलंडमध्ये असणार आहे. भारतीय अ संघ न्यूझीलंड दौऱ्यात न्यूझीलंड अ संघाविरुद्ध तीन अनौपचारिक टेस्ट खेळणार आहे. दोन्ही भारतीय संघांचा विचार केला तर ५०हून अधिक खेळाडू न्यूझीलंडमध्ये खेळतील.
न्यूझीलंडमधलं वातावरण भारताच्या तुलनेत अतिशय वेगळं असतं. वेगवान गोलंदाजीला पोषक अशा खेळपट्ट्या, बोचरे वारे, थंडी असं वातावरण असतं. अनेक युवा भारतीय खेळाडूंसाठी हा अनोखा अनुभव असेल. १५वर्षीय वैभव सूर्यवंशीसाठी महत्त्वाचा दौरा असणार आहे. दुसरीकडे भारताचे माजी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे फक्त वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असतील. टी२० मालिकेत इशान किशन, संजू सॅमसन यांच्याकडे विकेटकीपिंगची धुरा असणार आहे. पहिल्या तीन वनडेत केएल राहुल आणि इशान किशन हे विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळतील. उर्वरित दोन वनडेत राहुलऐवजी कुमार कुशाग्रला संधी मिळाली आहे. राहुल टेस्ट सीरिजच्या तयारीचा भाग असेल.
भारताचं प्रमुख अस्त्र असलेला जसप्रीत बुमराह फक्त दोन टेस्ट खेळणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून बुमराह या दौऱ्यात फक्त टेस्ट सीरिजमध्ये खेळताना दिसेल. प्रदीर्घ कालावधीनंतर भुवनेश्वर कुमारचं भारतीय संघात पुनरागमन होणार आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या ३७ खेळाडूंपैकी दोनच म्हणजे फिरकीपटू कुलदीप यादव आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी हे दोघे तिन्ही प्रकारात खेळताना दिसतील. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत नितीशवर मोठी जबाबदारी असणार आहे. कुलदीप यादवसाठी हा दौरा कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरू शकतो.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू
श्रेयस अय्यर (टी२०, वनडे)
इशान किशन (टी२०, वनडे)
नमन धीर (टी२०, वनडे)
संजू सॅमसन (टी२०)
वैभव सूर्यवंशी (टी२०,
तिलक वर्मा (टी२०, वनडे)
अभिषेक शर्मा (टी२०)
शिवम दुबे (टी२०)
नितीश कुमार रेड्डी (टी२०, वनडे, टेस्ट)
अक्षर पटेल (टी२०, वनडे)
अर्शदीप सिंग (टी२०, वनडे)
कुलदीप यादव (टी२०, वनडे, टेस्ट)
भुवनेश्वर कुमार (टी२०)
प्रिन्स यादव (टी२०)
वरुण चक्रवर्ती (टी२०)
मयांक यादव (टी२०)
शुबमन गिल (वनडे, टेस्ट)
यशस्वी जैस्वाल (टेस्ट)
विराट कोहली (वनडे)
रोहित शर्मा (वनडे)
केएल राहुल (वनडे, टेस्ट)
देवदत्त पड्डीकल (टेस्ट)
साई सुदर्शन (टेस्ट)
ऋषभ पंत (टेस्ट)
ध्रुव जुरेल (टेस्ट)
रवींद्र जडेजा (टेस्ट)
अंशुल कंबोज (वनडे, टेस्ट)
जसप्रीत बुमराह (टेस्ट)
प्रसिध कृष्णा (टेस्ट)
आकाश दीप (टेस्ट)
वॉशिंग्टन सुंदर (टेस्ट)
मोहम्मद सिराज (टेस्ट, वनडे)
गुरनूर ब्रार (वनडे)
ऋतुराज गायकवाड (वनडे)
आकिब नबी (वनडे)
कुमार कुशाग्र (वनडे)
यश ठाकूर (वनडे)
