Darius Visser Breaks Yuvraj Singhs Record: क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच नवनवीन विक्रम होत असतात. असाच सिक्सर किंग युवराज सिंगचा एक दुर्मिळ विक्रम मोडीत काढला आहे. टीम इंडियाचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने जेव्हा इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३६ धावा केल्या, तेव्हा हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता. मात्र आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. आता सामोआ देशाचा यष्टिरक्षक फलंदाज डॅरियस व्हिसरने पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून इतिहास घडवला आहे. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक उप-प्रादेशिक पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायर-ए स्पर्धेत सामोआच्या वानुआतू विरुद्धच्या सामन्यात व्हिसरने एकाच षटकात ३९ धावा केल्या.

हेही वाचा – Yuvraj Singh Biopic: वर्ल्डकप हिरो ते कर्करोगावर मात; युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा, मोठ्या पडद्यावर येणार सिक्सर किंगचा प्रेरणादायी प्रवास

Marnus Labuschagne Stuns Umpire With Unorthodox Field During Sheffield Shield Match Video Goes Viral
VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
India vs Bangladesh 1st T20 Match highlights
IND vs BAN : सूर्याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने फडकावली विजयी पताका, बांगलादेशचा ७ विकेट्सनी उडवला धुव्वा
Virat Kohli 27000 runs complete in international cricket
IND vs BAN : विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा
Australian captain Pat Cummins statement regarding Rishabh Pant
पंतला रोखणे आवश्यक -कमिन्स
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
IND vs BAN: रोहित शर्माने चेन्नई कसोटीत केला मोठा पराक्रम; २०२४ मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार
Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा

क्वालिफायर-ए सामन्याच्या १५व्या षटकात, व्हिसरने सहा गगनचुंबी षटकार ठोकले आणि वानुआतुचा वेगवान गोलंदाज नलिन निपिकोच्या तीन नो-बॉल्सनेही त्याला मदत केली. व्हिसरने भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याचा एका षटकात सर्वाधिक ३६ धावा करण्याचा विक्रम मागे टाकला आहे. २००७ मधील पहिल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारण्याचा भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या नावे आहे. कायरन पोलार्ड (२०२१ – ३६ धावा), निकोलस पूरन (२०२४ – ३६ धावा), दीपेंद्र सिंग आयरे (२०२४ – ३६ धावा) हे दिग्गज खेळाडूही मागे पडले आहेत.

हेही वाचा – Sourav Ganguly : ‘अशा घटना जगभर घडतात…’, कोलकाता प्रकरणावरील वक्तव्य सौरव गांगुलीला भोवलं, जारी केलं निवेदन

सामोआ देश नेमका आहे तरी कुठे?
सामोआ हा देश मध्य दक्षिण पॅसिफिक महासागरामधील एक बेट आहे. ते न्यूझीलंड आणि हवाई यांच्या मध्यभागी वसलं आहे. नऊ बेटांच्या द्वीपसमूहापासून तयार झालं आहे. नऊपैकी चार बेटांवर लोकवस्ती आहे. सवाई आणि उपोलू ही दोन मोठी बेटं आहेत.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सामोआ क्रिकेट संघाची सामन्याची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शॉन कॉटर (१४ धावा) आणि डॅनियल बर्जेस (१६ धावा) यांना मोठी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर डॅरियस व्हिसरने जबाबदारी घेतली. त्याने अवघ्या ६२ चेंडूत १३२ धावा केल्या, ज्यात त्याने ५ चौकार आणि १४ षटकार लगावले. त्याच्यामुळेच समोआ क्रिकेट संघ १७४ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला.

हेही वाचा – Manu Bhaker: ‘ते कदाचित माझ्या कानशिलात लगावतील…’, मनू भाकेर कोच जसपाल राणा यांच्याबद्दल असं का म्हणाली?

सामोआ क्रिकेट संघाचा फलंदाज डॅरियस विसर हा वानुआतु क्रिकेट संघाकडून नलिन निपिको १५वे षटक टाकत होता. या षटकात डेरियस व्हिसरने ६ षटकार ठोकले. पहिल्या ३ चेंडूंवर सलग सहा षटकार मारल्यानंतर त्याने शेवटच्या ६ चेंडूंवर आणखी ३ षटकार ठोकले. मात्र, नलिनने या षटकात ३ नो बॉलही टाकले.

एका षटकात ३९ धावा करताना षटकारांचा पाऊस


पहिला चेंडू – षटकार
दुसरा चेंडू – षटकार
तिसरा चेंडू – षटकार
चौथा चेंडू (नो बॉल)
चौथा चेंडू – षटकार
पाचवा चेंडू – निर्धाव
सहावा चेंडू (नो बॉल)
सहावा चेंडू (नो बॉल) – षटकार
सहावा चेंडू – षटकार

हेही वाचा – Sunil Gavaskar: “जेव्हा तिशी पार केलेला खेळाडू…”, विराट-रोहितच्या दुलीप ट्रॉफी न खेळण्यावर सुनील गावसकर संतापले, BCCI ला पण सुनावलं

डेरियस व्हिसरने या सामन्यात एका षटकात एकूण ६ षटकार ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एका षटकात ६ षटकार मारणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. डॅरियस व्हिसरच्या आधी युवराज सिंग, कायरन पोलार्ड आणि नेपाळच्या दीपेंद्र सिंग आयरी यांनी ही कामगिरी केली होती.

आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज


डेरियस व्हिसर – समोआ – ३९ धावा
युवराज सिंग – भारत – ३६ धावा
कायरन पोलार्ड – वेस्टइंडिज – ३६ धावा
रोहित शर्मा/रिंकू सिंग – भारत – ३६ धावा
दिपेंद्र सिंग आयरी – नेपाळ – ३६ धावा
निकोलस पूरन – वेस्टइंडिज – ३६ धावा