Fastest Fifty World Record In One Day Cricket : क्रिकेटमध्ये चाहत्यांना चौकार-षटकार पाहायला खूप आवडतात. पण जे खेळाडू सर्वात वेगवान धावा बनवतात आणि सामन्याचा रुपडं पालटतात त्या खेळाडूंना अधिक पसंत केलं जातं. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासात अशा अनेक दिग्गज खेळाडूंची नोंद झालीय. टी-२० क्रिकेट सुरु झाल्यापासून एकदिवसीय सामन्यातील स्ट्राईक रेटपर्यंत स्तर वाढला आहे. कमी स्ट्राईक रेटने धावा केलेल्या प्रेक्षकांनाही आवडत नाही. त्यामुळे चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

याआधी खेळाडू आक्रमक अंदाजात फलंदाजी करत नव्हेत असं नाहीय. त्या जमान्यातही अनेक असे फलंदाज होते, ज्यांनी खूप चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करुन अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. वनडेत सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंबाबत नेहमीच ऐकलं असेल. पण आम्ही तुम्हाला चार दिग्गज फलंदाजांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Akash Chopra Says Hardik Pandya’s yet but his absence is definitely hurting GT this season
IPL 2024 : “त्याच्या उपस्थितीचा मुंबईला फायदा झाला नसेल, पण…”, हार्दिक पंड्याबाबत माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
Jasprit Bumrah taking five wickets against RCB in IPL 2024
MI vs RCB : जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी इतका धोकादायक का आहे? आपल्या यशाचे गुपित स्वत:च केले उघड
Mayank Yadav Reveals About Fitness
IPL 2024 : सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवच्या फिटनेसचं रहस्य काय? त्यानंच सांगितलं तो काय करतो?

नक्की वाचा – …म्हणून सारा तेंडुलकरची होतेय चर्चा, अर्जुनने साहाला बाद केलं अन् साराची रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

४) मार्टिन गप्टिल – १७ चेंडू

न्यूझीलंडचा सलामी फलंदाज मार्टिन गप्टिल धडाकेबाज फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. जेव्हा त्याच्या लयमध्ये असतो त्यावेळी त्याला रोखणं गोलंदाजांसाठी कठीण बनतं. गप्टिलने २०१५ मध्ये श्रीलंकाविरुद्ध झालेल्या सामन्यात १७ चेंडूत अर्धशतक ठोकण्याची कामगिरी केली.

३) कुशल परेरा – १७ चेंडू

श्रीलंकेचा विकेटकीपर कुशल परेराच्या नावावरही १७ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. हा कारनामा त्याने २०१५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात केला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २८७ धावांपर्यंत मजल मारली होती.

२) सनथ जयसूर्या – १७ चेंडू

श्रीलंकेचाच आणखी एक माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज सनथ जयसूर्याने १७ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. त्याने ही चमकदार कामगिरी १९९६ मध्ये सिंगर कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २१५ धावा केल्या होत्या.

१) एबी डिविलियर्स १६ चेंडू

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. वेस्टइंडिजविरुद्ध २०१५ मध्ये त्याने फक्त १६ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला होता. डिविलियर्सने त्या सामन्यात फक्त ४४ चेंडूत ९ चौकार आणि १६ षटकारांच्या मदतीनं १४९ धावांची वादळी खेळी केली होती.