भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवला त्याच्याच मॅनेजरने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकेकाळचा जीवलग मित्र आणि मॅनेजर शैलेश ठाकरे याने उमेश यादवच्या बँक खात्यातून सुमारे ४४ लाख रुपये लंपास केले आहेत. आरोपीनं या रकमेतून स्वत:च्या नावे संपत्ती खरेदी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर उमेश यादवने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शैलेश ठाकरे विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

उमेश यादव याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर तो अनेकदा स्पर्धेच्या निमित्ताने देशात आणि परदेशात जावं लागत होतं. या काळात उमेश यादवने आपला मित्र आणि आरोपी शैलेश ठाकरे याला आर्थिक आणि पत्र व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी दिली. त्याने शैलेश ठाकरे याला पगारी मॅनेजर म्हणून नियुक्त केले.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

हेही वाचा- Olympics 2028: क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का! लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमधून क्रिकेटला डच्चू, ICC देखील हतबल

मॅनेजर म्हणून काम करताना आरोपी शैलेशने कोणतीही कामं केली नाहीत, असा आरोप उमेश यादवने केला. दरम्यान, एक संपत्ती खरेदी करण्यासाठी उमेश यादवने आपल्या बँक खात्यात एकूण ४४ लाख रुपये ठेवले होते. पण या पैशातून उमेश यादवसाठी संपत्ती खरेदी करण्याऐवजी शैलेश ठाकरेंन स्वत:साठी संपत्ती खरेदी केली. शिवाय उमेश यादवला हे पैसेही परत दिले नाहीत. शैलेश ठाकरेंने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर उमेश यादवने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हेही वाचा- IND vs NZ 2nd ODI: भारतीय गोलंदाजांपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांचे लोटांगण! विजयासाठी केवळ १०९ धावांचे लक्ष्य

उमेश यादवने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शैलेश ठाकरेचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा सविस्तर तपास कोराडी पोलीस करत आहेत.